शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाऱ्याने केली अर्जदाराची दिशाभूल

By admin | Updated: June 5, 2015 00:35 IST

के.के. लॉनसंंदर्भात अचलपूर नगर पालिकेचे कनिष्ठ अभियंता तथा जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जदारास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने

तीन दिवसांचा अल्टिमेटम : अचलपूर पालिकेतील प्रकार सुनील देशपांडे अचलपूरके.के. लॉनसंंदर्भात अचलपूर नगर पालिकेचे कनिष्ठ अभियंता तथा जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जदारास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरुन अपीलकर्त्याला तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने अपेक्षित माहिती द्यावी, असा निर्णय दिला. त्यानंतरही पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अपिलकर्त्याला माहिती न मिळाल्याने त्यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दिला आहे. अचलपूर येथील बिलनपुरा भागात ‘के.के.लॉन’ नावाने मंगल कार्यालय आहे. येथे विवाह समारंभ व विविध कार्यक्रम पार पडतात. या लॉनमधील उरलेले अन्न रस्त्यावर टाकले जाते. कार्यक्रमादरम्यान वाहतुकीची कोंडी तर होतेच; पण आपल्या घरापर्यंत ये-जा करताना भयंकर त्रास होतो. यावर प्रतिबंध लावण्यासाठी कारवाई करावी, अशी तक्रार गेल्यावर्षी मनीष लाडोळे, गणेश पोटे, राजू पोटे, गोपाळ आवनकर, गणेश बिखार, अभिजित मानकर, अरुण रेखाते, प्रभाकर थोरात, विलास थोरात, देवीदास इंगोले, उमेश पोळे, यांच्यासह आदी रहिवाशांनी नगर परिषदेचे मुख्याध्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्याकडे केली होती. त्यांनी लॉनचे मालक खान यांना यासंदर्भात नोटीसही बजावली होती. बिलनपुऱ्यातील रहिवासी मनीष ऊर्फ छोटू लाडोळे यांनी नगरपालिकेत ५ जानेवारी २०१५ रोजी प्रथम माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करुन के.के. लॉन या नावाने प्रचलित असलेल्या मंगल कार्यालयात पार्किंगसाठी जागा मंजूर नकाशात तरतूद आहे किंवा नाही, याबाबत विचारणा केली होती. तसेच मंगल कार्यालयास परवानगी देताना पाळावयाच्या अटी व शर्तींबाबत माहिती अपेक्षिली होती. या अर्जास प्रतिसाद देऊन जनमाहिती अधिकारी शशी तायडे यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी पत्र पाठवून विषयांकित बांधकामाच्या जागेच्या मालकाचे नाव तसेच जागेचा शिट नं.,प्लॉट क्रमांकाचा अर्जात उल्लेख नसल्याने माहिती देण्यास असमर्थता व्यक्त करुन २०१४-१५ या वर्षात के.के. लॉन या नावाने कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसल्याचे कळविले होते. लाडोळे यांनी या विषयाबाबत जनमाहिती अधिकारी यांच्याकडे ३ फेब्रुवारी २०१५ रोजी दुसरा अर्ज सादर करुन जनमाहिती अधिकाऱ्यांना अपेक्षित मालक प्लॉट नं. शिट नं. यांचा उल्लेख करुन माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. यात त्यांना बांधकामाचे प्रारंभपत्राची प्रत देण्यात आली. यात छोटू लाडोळे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अपिलीय अधिकाऱ्याकडे अपिल दाखल केल्यावर २५ मे २०१५ रोजी निर्णय देण्यात आला की, अपिलकर्ता सर्वसामान्य व्यक्ती असल्याने व तांत्रिक माहितीची अपेक्षा नसल्याने जनमाहिती अधिकाऱ्याने प्रथम अर्जावरच योग्य माहिती अपिलकर्त्याला देणे अपेक्षित होते. अपिलकर्त्याने पुनश्च ३ फेब्रुवारी २०१५ रोजी दुसरा अर्ज केल्यावर जनमाहिती अधिकाऱ्यांनी पूर्ण एक महिन्याचा वेळ घेऊन पूर्ण माहिती दिली नाही. वास्तविक पाहता जनमाहिती अधिकारी यांनी अपिलकर्त्यास बांधकामाच्या मंजूर नकाशाची प्रत व विकास नियंत्रण नियमावली जी मंगल कार्यालयाशी संंबंधित असेल ती देणे अपेक्षित आहे. पण ती जनमाहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही, असे अपिल क्रमांक ४३/१४३७/२०१५ च्या निकालपत्रात नमूद केले आहे. जनमाहिती अधिकारी आर.एन. तायडे यांनी हा निर्णय झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांत स्वखर्चाने अपिलकर्त्यास अपेक्षित आवश्यक माहिती स्वखर्चाने अपिलकर्त्यास द्यावी, असा निर्णय दिला. लाडोळे, कनिष्ठ अभियंता तथा माहिती अधिकारी तायडे यांना समोरासमोर बोलावून दोघांच्या बाजू मुख्याधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. निर्णयाला ५ दिवस उलटल्यानंतरही अपेक्षित माहिती न दिल्याने लाडोळे यांनी १ जून रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यात तायडे माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे.