शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत फडकला स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचा ध्वज

By admin | Updated: May 2, 2015 00:18 IST

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी स्थानिक इर्विन चौकात ‘स्वतंत्र विदर्भा’चा ध्वज फडकला.

‘विदर्भ माझा’चा पुढाकार : इर्विन चौकातून सुरूवातअमरावती : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी स्थानिक इर्विन चौकात ‘स्वतंत्र विदर्भा’चा ध्वज फडकला. ‘विदर्भ माझा’च्या वतीने महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. इर्विन चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शुक्रवारी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. ‘स्वतंत्र विदर्भ, सक्षम विदर्भ, विदर्भराज्य झालेच पाहिजे, हर घर का नारा, विदर्भ हमारा’ अशा घोषणांनी इर्विन चौक दणाणून गेला होता. विदर्भाला महाराष्ट्रात विलीन करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. विदर्भ जनआंदोलन समितीने जाळले मोदी, गडकरींचे पुतळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी विदर्भ जनआंदोलन समितीने बडनेरा येथील जुन्या वस्तीतील तेलीपुऱ्यात निषेध आंदोलन केले. स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरतानाच विदर्भ जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीशिवाय दूर होणार नाही. त्यामुळे विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी नेटाने लढा उभारून तो पूर्णत्वास नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.