शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी पोलिसांचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 23:55 IST

दहशतवादी हल्यांच्या धमकीमुळे शहर पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. स्वातंत्र दिनाच्या पर्वावर शहरातील चौका-चौकात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.

बीडीडीएसकडून तपासणी सुरू : इसिसच्या धमकीनंतर अलर्ट बडनेरा / अमरावती : दहशतवादी हल्यांच्या धमकीमुळे शहर पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. स्वातंत्र दिनाच्या पर्वावर शहरातील चौका-चौकात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. बिडीडीएस पथकाद्वारे शहरातील गर्दींची ठिकाणी व शासकीय कार्यालयांची तपासणी केली जात आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने दिलेल्या बॉम्ब स्फोटाच्या धमकीनंतर राज्यभरात अलर्ट जारी झाला. रेल्वे स्थानकासह गर्दीच्या अन्य सर्व ठिकाणांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली. रविवारी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी यांच्या नेत्तृत्वात पोलीस कर्मचारी रविद्र दलाल, भरत, मोहन, अनिल, अमर, अजय, गणेश, संतोष, मुकेश यांच्यासह श्वान प्रीन्स व तेजा यांनी विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, मॉडेल रेल्वे स्थानक, बसस्थानक, मोठे मॉल, अंबादेवी एकविरा देवी मंदिरासह महत्वाच्या ठिकाणांची तपासणी केली. या व्यतिरिक्त शहरातील हॉटेल लॉजीगमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. तसेच शहरातील अंतर्गत परिसरात सुध्दा पोलिसांनी गस्त वाढविली आहे. स्वातंत्र दिनी तर चौका-चौकात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १५०० पोलीस स्वातंत्र दिनी तैनात राहणार आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचारी शहराच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावर रुट मार्च अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी रविवारी पोलिसांनी रुट मार्च काढला. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे प्लॅटफार्मवरील सुरक्षेसंबधीत तपासणी व चौकशी करण्यात आली. प्रवाशी रेल्वे गाडीमधील संशयीत नागरिकांची पोलिसांनी चौकशी केली. जड वाहतुकीस प्रवेश बंदी बडनेरा / अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वांतत्र्यदिनी जड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस चौकस नजर ठेवून राहणार आहेत. शहरातील काही चौकांमध्ये नाकाबंदी लावून वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. फिक्स पार्इंटवरून जाणाऱ्या वाहनांकडे पोलिसांनी विशेष नजर राहणार आहे. त्यामुळे जड वाहन धारकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.सहा जणांचा आत्मदहनाचा इशारा विविध प्रलंबित मागण्यांसाठी उर्मिला जैन (रा. मांजरी म्हसला, नांदगाव खंडेश्वर), भारत विश्वनाथ हरणे (रा. बिच्छु टेकडी), ए.डब्ल्यू.ठवरे (रा. रहाटगाव), मोहन संपत आठवले (रा. महाजनपुरा), गजानन दामन साठे (रा. खेडपिंपरी, नांदगाव खंडेश्वर) यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आला असून पोलीस आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांचा शोध घेत आहेत. स्वातंत्र्यदिनाला गालबोट लागू नये, यासाठी कडक बंदोबस्त