शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा खर्च करण्याची वेळ या संपामुळे प्रवाशांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. त्यात अमरावती आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबरपासून सहभाग घेतला आहे. राज्य शासनात विलिनीकरण होईस्तोवर कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटना व संघर्ष ग्रुपमार्फत संप पुकारण्यात आला आहे.ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा खर्च करण्याची वेळ या संपामुळे प्रवाशांवर ओढावली आहे. या संपात संजय मालविय, राजेश विजयकर, संजय बंसोड, अशोक बोरकर, आशिष वलिवकर, शिवदास भारती, विनोद ढोलवाढे, बाळासाहेब सावळे, सत्यम सोनोने, अजय तायडे, प्रवीण ढोके, राहुल उईके, अलिम, प्रशांत सकसुळे, गोपाल कोहळे, अमोल क्षीरसागर, अ. हनिफ, सतीश कडू, हरिओम इंगोले, अशोक आमझरे यांच्या २०८ कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूटअमरावती-दर्यापूर एसटी बसची तिकीट ९० रुपये असताना संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहनधारकांद्वारा चक्क १५० रुपये आकारण्यात येत आहे. नाईलाज म्हणून प्रवाशांना दीडशे रुपये देऊनही दाटीवाटीने प्रवास करावा लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

अपघात विम्याची जमा रक्कम गेली कुठे? तत्कालीन राज्यपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये प्रत्येक प्रवासी तिकिटावर अपघात विम्यासाठी एक रुपया जमा करण्याचा निर्णय झाला. त्याद्वारा प्रतिदिवस राज्यभरातून ६० लाख रुपये जमा होत आहे. ती रक्कम आहे कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप