अंबा फेस्टिव्हलचे उद्घाटन ...

By Admin | Updated: October 15, 2015 00:16 IST2015-10-15T00:16:03+5:302015-10-15T00:16:03+5:30

गेल्या काही वर्षांपासून शहरातील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात येणारा अंबा फेस्टिव्हल अमरावतीनगरीचे वैशिष्ट्य ठरू लागला आहे.

The inauguration of Amba Festival ... | अंबा फेस्टिव्हलचे उद्घाटन ...

अंबा फेस्टिव्हलचे उद्घाटन ...

गेल्या काही वर्षांपासून शहरातील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात येणारा अंबा फेस्टिव्हल अमरावतीनगरीचे वैशिष्ट्य ठरू लागला आहे. यावर्षीदेखील अंबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ना. रणजीत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. २२ आॅक्टोबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. उद्घाटन समारोहात महापौर चरणजीत कौर नंदा, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, लप्पीसेठ जाजोदिया, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले, खा. आनंदराव अडसूळ आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नृत्य, संगीत, कलेसह विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

Web Title: The inauguration of Amba Festival ...