लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. दिवसाचा पारा चाळिशी पार गेला आहे. अशातच प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी रविवार व सोमवारी 'हिट वेव्ह' म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारा करण्यात आले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशाबदलांसह कोरड्या हवामानामुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होत आहे. विशेषतः पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्याचे कमाल तापमान तीन दिवसांपासून ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. शिवाय रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.
दुपारच्या वेळी फिरणे टाळा, आवाहन
बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. चहा, कॉफी आणि मद्यपान टाळा आणि फिकट रंगाचे कपडे वापरा व भर उन्हात जड शारीरिक कष्टाची कामे करू नका, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारा करण्यात आले आहे. तापमानवाढ होणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आहे.
उष्माघाताची लक्षणे ओळखा
तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा प्रचंड घाम येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत न्यावे, शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पशुधनाची घ्यावी काळजी
- वाढत्या तापमानाचा फटका १ केवळ माणसांनाच नाही, तर जनावरांनाही बसत आहे. दुभत्या जनावरांना शक्यतो सावलीत बांधावे आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय कायम ठेवावी.
- पिकांना शक्य असल्यास रात्री किंवा पहाटे पाणी द्यावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल. दरम्यान शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची मळणी होत आहे. मात्र ही कामे यांत्रिकीकरणाद्वारे करण्यावर शेतकऱ्यांचा कल आहे. याशिवाय शेतांमधील मशागतीची कामे
Web Summary : Akola, Amravati, and Wardha face a heatwave alert with temperatures exceeding 40°C. Residents are urged to take precautions: stay hydrated, avoid midday sun, wear light clothing, and recognize heatstroke symptoms. Farmers should provide shade and water for livestock and irrigate crops at night.
Web Summary : अकोला, अमरावती और वर्धा में तापमान 40 डिग्री सेल्सियस से ऊपर जाने पर लू का अलर्ट जारी किया गया है। निवासियों को सावधानी बरतने की सलाह दी जाती है: हाइड्रेटेड रहें, दोपहर की धूप से बचें, हल्के कपड़े पहनें और हीटस्ट्रोक के लक्षणों को पहचानें। किसानों को पशुधन के लिए छाया और पानी की व्यवस्था करनी चाहिए और रात में फसलों की सिंचाई करनी चाहिए।