शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

'मिनरल वॉटर'च्या नावावर अशुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2015 00:32 IST

विदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो.

सचिन सुंदरकर अमरावतीविदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो. हेच भावनिक औचित्य साधून मिनरल वॉटरच्या नावावर अशुध्द पाणी पुरविण्याचा गोरखधंदा जोरात आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या व्यवसायावर कुणाचाच अंकुश नाही, हे बोचरे वास्तव आहे. लग्न अथवा इतर प्रसंगात थंड पाण्याच्या कॅन दिसतात. थंड पाणी पाहून पाहुण्यांनाही समाधान वाटते. थंड केलेले शुध्द पाणी देणे आज एक प्रतिष्ठेचाही भाग झाला आहे. बाजारात असणारी भयंकर स्पर्धा व जास्त नफा मिळविण्याची वृत्ती यामुळे मिनरल वॉटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. साधारणे ३० रुपयांत २० लिटर अशुध्द, दूषित पाण्याची कॅन मिळत आहे. या कॅनमध्ये रिव्हर्स आॅसमॉसिस (आरओ) ही शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले शुध्द पाणी असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अल्ट्राव्हायोलेट किरणांनी (युव्ही) हे पाणी अगदी कमी खर्चात फिल्टर केले जाते. पाणी निर्जंतूक व्हायचे असेल तर ते रिव्हर्स आॅसमॉसिस व अल्ट्राव्हॉयलेट प्रक्रियेतून जाययलाच हवे. पिण्यायोग्य पाण्यात क्षाराचे अर्थात टीडीएसचे प्रमाण ७० ते ८० पेक्षा जास्त नको. त्यापेक्षा जास्त टीडीएस असल्यास आरोग्याच्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. विक्री होणाऱ्या पाण्यात टीडीएसदेखील जादा असते. व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी आरओ प्रक्रिया न करताच थंड पाणी विकले जाते. पाणी थंड असल्यास ग्राहकाला त्यातील टीडीएसची फारशी कल्पना येत नाही. थंड पाण्यामुळे पाण्याच्या चवीकडे दुर्लक्ष होते. लग्नसमारंंभात मिळणारे बहुतांश ठिकाणचे पाणी अशुद्ध असते. शुल्क मात्र शुद्ध पाण्याचे आकारले जाते. सार्वजनिक कार्यक्रमांत पुरविले जाणारे पाणी स्वच्छ, शुद्ध आहे की की की कसे हे तपासण्याची जबाबदारी कुणाची हा अडचणीचा मुद्दा उपस्तिि होतो. सबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाची ही जबाबदारी आहे.