शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागांवर अवैध होर्डिंग्जची उभारणी

By admin | Updated: May 15, 2014 23:07 IST

शासकीय जागांवर परवानगी न घेता अवैध होर्डिंग्जची उभारणी राजरोसपणे सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ज्या जागेवर होर्डिंगची उभारणी होत आहे

अमरावती : शासकीय जागांवर परवानगी न घेता अवैध होर्डिंग्जची उभारणी राजरोसपणे सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ज्या जागेवर होर्डिंगची उभारणी होत आहे ती जागा वाहनतळासाठी राखीव असल्याची माहिती आहे.

होर्डिंग्ज, फ्लेक्स उभारणीसंदर्भात उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिले आहेत. तरीदेखील महानगरात नियम वेशीवर टांगून अवैध होर्डिंग उभारले जात आहे. काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र महल्ले यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेऊन शहरात ३८ जागी अवैधरित्या होर्डिंंग्ज उभारले गेल्याची तक्रार केली होती. परंतु प्रशासनाने या अवैध होर्डिंग्जबाबत अद्यापपर्यंंत कोणतीही कारवाई केली नाही. होर्डिंंग्ज उभारायचे झाल्यास सहायक संचालन नगररचना विभाग व बाजार परवानाकडून रितसर मंजुरी प्राप्त करावी लागते. मात्र शहरात उभारले जात असलेल्या होर्डिंंग्ज मालकाकडून कोणतीही परवानगी न घेता अगोदर होर्डिंंग्ज उभारायचे, त्यानंतर परवानगीसाठी अर्ज करायचा, असा अफलातून प्रकार सुरु आहे. या प्रकाराला बाजार परवाना विभागाचे अभय असल्याचा आरोपही नगरसेवक राजेंद्र महल्ले यांनी केला होता.

हल्ली बडनेरा जुनी वस्तीतील सावता मैदानलगत शासकीय जागेवर अवैध होर्डिंंग्ज उभारले जात आहे. या होर्डिंंग उभारणीला प्रशासनाने परवानगी दिली की नाही, हा विषय गुलदस्त्यात आहे. मात्र शासकीय जागेवर रस्त्यालगत दर्शनी भागात होर्डिंंग्ज उभारण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे. परवानगी न घेता होर्डिंंग उभारणे हे नियमाला छेद देण्याचा प्रकार असताना प्रशासनाकडून हा प्रकार रोखण्यासाठी कोणतेही कठोर पाऊल महापालिकेकडून उचलले जात नाही, असे दिसून येते. महापालिकेच्या रेकॉर्डवर सावता मैदानलगतची जागा वाहनतळासाठी राखीव आहे. परंतु या जागेवर अवैधरित्या होर्डिंंग उभारले जात आहे. हा प्रकार कोण थांबविणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराच्या मुख्य चौकात आणि राष्ट्रीय महामार्गालगत परवानगी न घेता होर्डिंंगची उभारणी केली जात आहे. हा प्रकार वेळीच थांबविला गेला नाही तर शहराचे विद्रुपीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव आहे.