शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

तुमसे मिल कर ना जाने क्यूं.. और भी कुछ याद आता है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:16 IST

पाच दशके सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया अष्टपैलू कलावंत पद्मीनी कोल्हापुरे यांनी अमरावतीकरांसाठी ......

ठळक मुद्देपद्मिनी कोल्हापुरेंनी जिंक ली मने : कर्तृत्ववान महिलांना अहिल्यादेवी स्त्री पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच दशके सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया अष्टपैलू कलावंत पद्मीनी कोल्हापुरे यांनी अमरावतीकरांसाठी ‘तुमसे मिलकर ना जाने क्यूं... और भी कुछ याद आता है...’ हे ‘प्यार झुकता नही’चित्रपटातील त्यांच्यावरच चित्रित झालल्या अजरामर गीताच्या काही ओळी गुणगुणल्या आणि उपस्थित दर्शकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. अंबानगरीविषयीचा स्नेह पद्मीनी कोल्हापुरेंनी या गीतामधून आगळ्या पद्धतीने व्यक्त केला.येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने रविवारी अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार २०१७ वितरण सोहळा थाटात पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खा.विकास महात्मे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, रजनी पंडित, प्रज्ञा पाटील, कल्पना दिवे उपस्थित होते.या ठरल्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराच्या मानकरीविविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया चार महिलांना राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार २०१७ ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतीक्षा लोणकर (अभिनय), रजनी पंडित (समाजसेवा), प्रज्ञा पाटील (क्रीडा) व कल्पना दिवे (उद्योजिका) यांना स्मृतिचिन्ह, घोंगडी देऊन लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पद्मीनी कोल्हापुरे, खा. विकास महात्मे, खा. अडसूळ, पालकमंत्री पोटे आदींच्या हस्ते गौरविण्यात आले.पालकमंत्र्यांचा स्त्रीशक्तीला ‘सॅल्यूट’येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात सलग तीन तास चाललेल्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आणि स्त्रीकर्तृत्वाचे गुणगाण बघून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मनोगतातून स्त्रीशक्तीला ‘सॅल्यूट’ केला. प्रशासन, अभिनय, क्रीडा व उद्योजक क्षेत्रात स्त्रियांनी घेतलेली भरारी ही अभिमानास्पद आहे. येथे उपस्थित असलेली प्रत्येक महिला ही स्त्रीशक्तीच आहे. म्हणूनच स्त्रीशक्तीला माझा ‘सॅल्यूट’ असे ते आवर्जून म्हणाले.