तुमसे मिल कर ना जाने क्यूं.. और भी कुछ याद आता है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:16 IST2017-08-13T23:15:58+5:302017-08-13T23:16:46+5:30

पाच दशके सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया अष्टपैलू कलावंत पद्मीनी कोल्हापुरे यांनी अमरावतीकरांसाठी ......

I do not want to meet you and remember something else | तुमसे मिल कर ना जाने क्यूं.. और भी कुछ याद आता है

तुमसे मिल कर ना जाने क्यूं.. और भी कुछ याद आता है

ठळक मुद्देपद्मिनी कोल्हापुरेंनी जिंक ली मने : कर्तृत्ववान महिलांना अहिल्यादेवी स्त्री पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाच दशके सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया अष्टपैलू कलावंत पद्मीनी कोल्हापुरे यांनी अमरावतीकरांसाठी ‘तुमसे मिलकर ना जाने क्यूं... और भी कुछ याद आता है...’ हे ‘प्यार झुकता नही’चित्रपटातील त्यांच्यावरच चित्रित झालल्या अजरामर गीताच्या काही ओळी गुणगुणल्या आणि उपस्थित दर्शकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. अंबानगरीविषयीचा स्नेह पद्मीनी कोल्हापुरेंनी या गीतामधून आगळ्या पद्धतीने व्यक्त केला.
येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने रविवारी अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार २०१७ वितरण सोहळा थाटात पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खा.विकास महात्मे, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, रजनी पंडित, प्रज्ञा पाटील, कल्पना दिवे उपस्थित होते.
या ठरल्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराच्या मानकरी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया चार महिलांना राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार २०१७ ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतीक्षा लोणकर (अभिनय), रजनी पंडित (समाजसेवा), प्रज्ञा पाटील (क्रीडा) व कल्पना दिवे (उद्योजिका) यांना स्मृतिचिन्ह, घोंगडी देऊन लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पद्मीनी कोल्हापुरे, खा. विकास महात्मे, खा. अडसूळ, पालकमंत्री पोटे आदींच्या हस्ते गौरविण्यात आले.
पालकमंत्र्यांचा स्त्रीशक्तीला ‘सॅल्यूट’
येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात सलग तीन तास चाललेल्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आणि स्त्रीकर्तृत्वाचे गुणगाण बघून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मनोगतातून स्त्रीशक्तीला ‘सॅल्यूट’ केला. प्रशासन, अभिनय, क्रीडा व उद्योजक क्षेत्रात स्त्रियांनी घेतलेली भरारी ही अभिमानास्पद आहे. येथे उपस्थित असलेली प्रत्येक महिला ही स्त्रीशक्तीच आहे. म्हणूनच स्त्रीशक्तीला माझा ‘सॅल्यूट’ असे ते आवर्जून म्हणाले.

Web Title: I do not want to meet you and remember something else