शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दुपारचे दोन वाजले तरी लग्नात कसे पोहोचले नाही?

By admin | Updated: August 7, 2015 00:20 IST

लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला.

लग्नाला जाताना आजनकर कुटुंबावर काळाचा घालाअमरावती : लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला. दुपारचे २ वाजले तरी लग्नघरी कसे पोहोचले नाहीत, अशी शंका यवतमाळात असलेल्या लहान भावाच्या मनात आली. त्याने दोनही भावांच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी भावाने दुचाकी काढून शोध सुरू केला. नातेवाईकही शोध मोहिमेत सहभागी झालेत. अखेर ज्याचे भय होते तेच झाले. तिवसा तालुक्यातील नाल्याच्या पुरात कारसह चौघेही वाहून गेल्याचे स्पष्ट झाले. ही वार्ता कळताच वृद्ध पित्यासह सर्वच हादरले. सकाळी आनंदात गेलेल्या चौघांचे कलेवर पाहण्याचीच वेळ यवतमाळातील रेणुकानगरावर आली. चांदूररेल्वे येथील गजाननच्या साडुच्या मुलाचे आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे बुधवार सकाळी ११ वाजता लग्न होते. संजयच्या अल्टो कारने (क्र. एम.एच-२९-एडी-४४९६) आजनकर परिवार वर्धमनेरीकडे सकाळी ७ वाजता रवाना झाला होता.चांदूररेल्वेत शोककळाआजनकर परिवारातील नातेवाईक, चांदूररेल्वे येथील धनराज होले यांचे बुधवारी ५ आॅगस्टला वर्धमनेरी येथे लग्न होते. त्याच ठिकाणी आजनकर परिवार जात होता. दरम्यान ही दुर्दैवी घटना झाली. चौघांचेही शवविच्छेदन चांदूररेल्वे येथेच झाल्याने नातेवाईकांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेमुळे चांदूररेल्वे शहरात शोककळा पसरली आहे. सान्वीचे होमवर्क राहूनच गेले! पुरात वाहून गेलेल्या कारमध्ये मृत्युमुखी पडलेली सान्वी यवतमाळच्या जांब मार्गावरील आदर्श कॉन्व्हेंटमध्ये केजी-२ ला शिकत होती. मंगळवारी तिच्या वर्ग शिक्षिका वैशाली पाटणे हिने तिला होमवर्कबाबत विचारले होते. ‘आम्ही उद्या गावी जाणार आहोत. त्यानंतर होमवर्क दाखविते’, असे सान्वी म्हणाली होती. मात्र गुरुवारी तिच्या मृत्यूचीच वार्ता शाळेत धडकली आणि आदर्श कॉन्व्हेंटमध्ये शोककळा पसरली. मुलाला वाचविण्यासाठी दिली होती प्राणांची आहुतीआजनकर परिवारावर नियतीने दुसऱ्यांदा क्रूर आघात केला. सहा महिन्यांपूर्वी पशुवैद्यक संजय आजनकर यांची पत्नी स्वाती यांनी मधमाश्यांचा हल्ला अंगावर झेलून प्राणांची आहुती दिली. कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे दर्शनासाठी त्या परिवारासह गेल्या होत्या. त्यावेळी झाडावरील मधमाश्यांचे पोळ उठले. स्वाती यांच्या मांडीवर असलेल्या चिमुकल्या श्रीपाद नामक मुलाला मधमाशा चावू नयेत म्हणून त्याला शरीराच्या कवचाखाली सुरक्षित ठेऊन मधमाश्यांचा मारा त्या शूर आईने स्वत:वर झेलला. मधमाश्यांच्या असंख्य डंखाने गंभीर अवस्थेत रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेपाठोपाठ आता दुसरा भयंकर आघात या कुटुंबावर झाला.