शहरं
Join us  
Trending Stories
1
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
2
Top Marathi News Live Updates: मंत्री नितेश राणे पायी चालत कॅबिनेट बैठकीसाठी हजर, इंधन बचतीचा नवा आदर्श
3
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
4
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
5
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
6
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
7
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
8
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
9
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
10
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
11
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
12
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
13
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
14
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
15
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
16
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
17
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
18
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
19
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
20
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादन योजनेच्या अनुदान वाटपात घोळ

By admin | Updated: June 12, 2014 23:41 IST

राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत पीक सरंक्षण उपकरणाकरिता शेतकऱ्यांना काही ठिकाणी ५० टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे योजनेचे नेमके अनुदान किती?

वरुड : राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत पीक सरंक्षण उपकरणाकरिता शेतकऱ्यांना काही ठिकाणी ५० टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे योजनेचे नेमके अनुदान किती? हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानात घोळ असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
शेती कामामध्ये मजुरांची कमी होणारी संख्या, मजुरीवरील खर्च यामुळे मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. पिकांचा उत्पादन खर्च वाढतो, यामुळे फलोत्पादन क्षेत्रामध्ये यंत्राचा वापर अनिवार्य झाला. या बाबी विचारात घेऊन शेतकऱ्यांना, उत्पादक संघ व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे, सयंत्रे, अनुदानावर उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन यांत्रिकीकरण हा घटक राबविण्यात येत आहे. शेतीची कामे वेळेवर होण्याकरिता शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, फलोत्पादन पिकांच्या उत्पादकता खर्चात बचत करणे यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत पीक संरक्षण उपकरणाच्या खरेदीवर कमीत कमी ५० टक्के व अधिकाधिक १७ हजार ५०० रुपये मर्यादेत अनुदान देण्याची योजना २०१०-११ पासूून लागू करण्यात आली.
जिल्हा कृषी अधीक्षक या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी आहेत. २०१०-११ या वर्षापासून ही योजना सुरु झाली आहे. सन २०१३-१४ या वर्षात वरुड तालुक्यातील २९ लाभार्थी शेतकऱ्यांना ५० टक्के तर काही शेतकऱ्यांना ५० टक्के पेक्षाही कमी अनुदानाचे धनादेश देण्यात आले. मोर्शी तालुक्यातील लेहेगाव येथील शेतकरी अरविंद तट्टे यांनी २३ हजार १०० रुपयांचा शोल्डर पंप खरेदी केला. त्यांना ५० टक्के अनुदानाची रक्कम ११,५०० रुपये मिळणे आवश्यक होते. परंतु जिल्हा कृषी अधीक्षकांनी अरविंद तट्टे यांच्या नावाने ७ हजार ८५० रुपयांचा धनादेश काढला. शेवटी तट्टे यांनी धनादेश जिल्हा कृषी अधीक्षकांना परत दिला. वरुड तालुक्यात शोल्डर पॉवर स्प्रेअरकरिता ११ लाभार्थ्यांना प्रत्येकी ७ हजार ८५० रुपये असे एकूण ८६ हजार ३५० रुपयांचे अनुदान वाटप, ब्रशकटर खरेदी करणाऱ्या ६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ७ हजार २४५ रुपये असे एकूण ४३ हजार ४७० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. एचटीपी पंप १२ लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आले असून प्रत्येकी ९ हजार ७०० रुपये असे एकूण १ लाख १६ हजार ४०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. हे अनुदान ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.