शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

घर, बंगला, फ्लॅटधारकांनाही हवे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

८२ हजार ९७७ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थींच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही  कामे प्रगतिपथावर आहेत.  या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने डोक्यावर छत उभे राहणार आहे. 

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या  योजनेत जिल्ह्याला १ लाख ७ हजार १७४ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याकरिता ९८ हजार ६५२ लाभार्थींनी नोंदणी केली आहे. यात ८२ हजार ९७७ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थींच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही  कामे प्रगतिपथावर आहेत.  या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने डोक्यावर छत उभे राहणार आहे. योजनेसाठी आर्थिक मागास घटकातील नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये घर, बंगला, फ्लॅट असलेल्यांचाही समावेश असून, पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे.

पात्र अर्जदारांची जॉब कार्ड मॅपिंगघरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ९० ते ९५  दिवसाच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसाहाय्य दिले जाते. लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी ९५ हजार अर्थसाहाय्य दिले जाते. सन २०११ च्या आर्थिक वा सामाजिक व जात सर्वेक्षण माहितीच्या आधारे यादी तयार करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना डोक्यावर छत हा योजनेचा उद्देश आहे.

पंतप्रधान योजनेचा लाभ कुणाला?वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांना लाभ मिळू शकतो. वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखांपर्यंत असलेले कुटुंब व मध्यम उत्पन्नगटात ६ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी वर्गातील महिला अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गाचा या यादीत समावेश होतो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना