शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशी एसटीलाही सुट्टी

By admin | Updated: August 19, 2014 23:19 IST

विद्यार्थ्यांना त्रास : खामगाव आगाराचा अफलातून निर्णय

खामगाव : आठवड्याचा रविवार तसेच इतर येणार्‍या शासकीय सुट्टीच्या दिवशी खामगाव आगाराची शहापूर, पिंपळखुटा मुक्कामी बसगाडी सुद्धा सुटी घेत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खामगाव आगाराच्या अटाळी मार्गे शहापूर पिंपळखुटा एस.टी. बसेस चालू आहेत. रस्ता नादुरूस्त असल्याने गेल्या महिनाभरापासून पिंपळखुटा बस बंद करून ती शहापूर करण्यात आली आहे. शहापूर मुक्कामी असणार्‍या बसेस सकाळी ६ वाजेच्या दरम्यान तर दुसरी बस ७ वाजेच्या दरम्यान खामगावला निघते. या गाडीमध्ये वहाळा, कंचनपूर, बोथाकाजी, बोरीअडगाव यासोबत अटाळीपासून अनेक विद्यार्थी तसेच ग्रामस्थही सकाळीच खामगावात पोहचतात. मात्र खामगाव आगाराने अफलातून निर्णय घेवून पिंपळखुटा, शहापूर ही बसगाडी दर रविवारी तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. ही मुक्कामी बसगाडी बंद असल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता निघणार्‍या मुलांना ७ वाजेच्या एसटीने जावे लागत असल्याने शाळेत पोहचण्यास उशीर होतो. विद्यार्थ्यांनी याबाबत आगार व्यवस्थापकाकडे अनेकवेळा बसगाडी सुरू ठेवण्याची मागणी केली असता खामगाव आगाराने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तरी विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचविण्यासाठी पिंपळखुटा, शहापूर बसगाडी सुरूच ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

उत्पन्न लाखोचे : सुविधाबाबत हलगर्जीपणा

खामगाव आगाराला विद्यार्थी तसेच इतर पासेसमधून दरमहा लाखोंचे उत्पन्न मिळत असतानाही विद्यार्थ्यांना मात्र सुविधा देण्यात आगार व्यवस्थापक कमी पडत आहे. गेल्या गुरूवारी शहापूर मार्गे ३ वाजेपासून एकही बस लागली नाही. परिणामी या मार्गावरील ३0 ते ४0 विद्यार्थ्यांना रात्री ९ वाजता घरी पोहचावे लागले. विद्यार्थ्यांचे पालक गावातील बसथांब्यावर वाट पाहत ताटकळत उभे होते. यावरून स्थानक व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा दिसून येतो.