शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पाऊस, नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST

अमरावती : दहा दिवसांच्या ब्रेकनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. ८८ मंडळांपैकी एकूण नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भातकुली, दर्यापूर ...

अमरावती : दहा दिवसांच्या ब्रेकनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. ८८ मंडळांपैकी एकूण नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भातकुली, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात पावसाने नदी-नाल्यांना पूर आला व पिकांसह काही घरांचे नुकसान झाले. काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले. याशिवाय माती खरडून गेल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत २३२.६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २६०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ११२.१ आहे. २४ तासांत भातकुली तालुक्यात ८४.९ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. याशिवाय सर्वात कमी २.३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात आलेला आहे. चिखलदरा तालुक्यात ६ मिमी, अमरावती १४.४, नांदगाव खंडेश्वर २६.४, चांदूर रेल्वे १४.७, तिवसा १३.७, मोर्शी १७.१, वरुड २४.७, दर्यापूर ४८.६, अंजनगाव सुर्जी ४८.१, अचलपूर २१.७, चांदूर बाजार २२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २२.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

विदर्भाचे नंदनवन मेळघाट यंदा पावसात माघारले. धारणी तालुक्यात जिल्ह्यात सर्वांत कमी १४१.४ व चिखलदरा तालुक्यात २२३.७ मिमी पावसाची नोंद झाली. अपेक्षित पावसाच्या तुलनेत ते ४० ते ६० टक्के आहे.

बॉक्स

आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)

तालुका अपेक्षित पाऊस झालेला पाऊस

धारणी २९४.८ १४१.४

चिखलदरा ३५०.४ २२३.७

अमरावती २६३.८ २२८.५

भातकुली २१६.८ २९०.०

नांदगाव २३७.२ ३१८.१

चांदूर रेल्वे २२३.० ३५७.६

तिवसा १९८.० २३९.१

मोर्शी २३२.७ २१४.०

वरूड २२८.५ २४४.५

दर्यापूर १७४.२ ४१२.६

अंजनगाव १७७.१ ३३३.७

अचलपूर २४१.४ १९८.४

चांदूर बाजार १८८.० २२६.२

धामणगाव २९६.८ २९१.४

एकूण २४४.१ २६०.६

बॉक्स

या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी

जिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार, भातकुली तालुक्यात भातकुली, पूर्णानगर, आष्टी, निंबा, आसरा, खोलापूर, वरूड तालुक्यात पुसला, दर्यापूर तालुक्यात येवदा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात येवदा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय दर्यापूर, वडनेर गंगाई, कापूसतळणी, धानोरा, माहुली या मंडळांमध्येही ५० ते ६२ मिमी दरम्यान पावसाची नोंद झालेली आहे. रविवार हा सार्वजनिक सुटीचा दिवस असल्याने प्राथमिक अहवाल तयार करण्यात आलेला नाही.

बॉक्स

भंडारजला घरावर पडली वीज

अंजनगाव तालुक्यातील भंडारज येथे श्रीधर माधव गिते यांच्या घरावर शनिवारी रात्री वीज पडल्याने घराची भिंत पडली. उपकरणे जळाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जामनी, खिरसाना, निरसाना येथे रात्रीच्या पावसाने घरांच्या भिंती पडल्या व जामनी येथील एक आंब्याचे झाड उन्मळून पडले आहे.