शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात १७ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:01 IST

गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन अधिकारी गौहर हसन यांनी केली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल शेख गणी व विराज ठाकूर यांनी सहकार्य केले. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास बैतूल मार्गावरील बैतूल नाक्यासमोरील स्मशानघाटालगत हा ट्रक ताब्यात घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दिल्लीवरून बैतूलमार्गे परतवाड्याकडे येत असलेला १६ लाख ९५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा असलेले पन्नास पोते वाहून आणणारा १४ चाकी ट्रक पोलिसांनी पकडला. आरजे ११ जीबी ८५९३  क्रमांकाच्या ट्रकसह एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन अधिकारी गौहर हसन यांनी केली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल शेख गणी व विराज ठाकूर यांनी सहकार्य केले. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास बैतूल मार्गावरील बैतूल नाक्यासमोरील स्मशानघाटालगत हा ट्रक ताब्यात घेण्यात आला. परतवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रक लावल्यानंतर झडती घेतली असता त्यात ‘’वाह’’ नामक गुटख्याचे पन्नास पोती आढळून आली. ही पोती ट्रकच्या मधोमध ठेवून त्याच्या आजूबाजूला व वर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बॉक्स ठेवण्यात आले होते. यामुळे या पोत्यांचा अंदाज येणेही शक्य नव्हते. पायलटिंग करणारी कार (एमएच ४३ डी ८३४४) ट्रकच्या पुढे मार्गस्थ होती. ही बाब लक्षात येताच आयपीएस गौहर हसन यांनी ही कारही परतवाडा पोलीस ठाण्यात उभी केली. या कारमधून प्रवास करणाऱ्या अचलपूर येथील तीन व्यक्तींना रात्रभर पोलीस स्टेशनला  डिटेन करून ठेवण्यात आले. 

गुटख्याची खेप अमरावतीला?ट्रकचालकाच्या सांगण्यानुसार, ही खेप अकोल्यासाठी होती. पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा नव्हे, तर सुगंधी पदार्थ असल्याचे ट्रक भरताना सांगितले गेल्याचे तो म्हणाला. काहींच्या मते हा गुटखा अमरावतीला उतरविला जाणार होता. पुढील तपास परतवाडा ठाणेदार संतोष ताले व त्यांचे सहकारी करीत आहेत.

चालक ताब्यातट्रकचालक रामभरण धाकड व क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या प्रतिबंधित गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

गुप्त माहितीच्या आधारे बैतूल-परतवाडा रोडवर बैतूल नाक्याच्या पुढे प्रतिबंधित गुटखा घेऊन येत असलेला ट्रक पकडण्यात आला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास हा ट्रक पकडण्यात आला.- गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपूर.

प्रतिबंधित गुटखा आयपीएस गौहर हसन यांनी पकडला असून त्यांची ही कारवाई आहे. यातील गुटख्याच्या एका पोत्याची किंमत ३३ हजार ९०० रुपये आहे. एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी