विद्यार्थ्‍यांचा ‘कोरोना बालवीर’मेडल देवून सत्‍कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:38+5:302021-02-05T05:34:38+5:30

अमरावती : दहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर बुधवारी इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू झाले. लॉकडाऊनच्या ...

Greetings to the students by giving ‘Corona Balveer’ medal | विद्यार्थ्‍यांचा ‘कोरोना बालवीर’मेडल देवून सत्‍कार

विद्यार्थ्‍यांचा ‘कोरोना बालवीर’मेडल देवून सत्‍कार

अमरावती : दहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर बुधवारी इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू झाले. लॉकडाऊनच्या कठीण काळात विद्यार्थ्‍यांनी, त्रास सहन करीत कोरोनाशी झुंज दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना "कोरोना बालवीर" या मेडलने सन्मानित करून शिक्षण समिती सभापती आशिष गावंडे, मुख्याध्यापक योगेश पखाले व शाळेतील शिक्षकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

शाळेत प्रवेशाआधी मुलांचे थर्मल गनने तापमान मोजण्‍यात आले. पल्स ऑक्सिमिटरने पल्स रेट मोजून, मास्क व सॅनिटायझर देण्‍यात आले. मुलांना मेडल व पुष्प मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. या नवीन उपक्रमाबद्दल शिक्षण समिती सभापतींनी शाळेचे कौतुक केले.

कार्यक्रमाकरिता शिक्षिका ज्योति अस्वार, नीलिमा गुल्हाने, चेतना बोंडे, प्रणिता देशमुख, कान्होपात्रा बुरघाटे, सुलोचना डाखोळे, प्रियंका हंबर्डे, मोनिका पंधरे, अनिता विधाते, मनीषा वाकोडे, ज्योत्स्ना खडसे ,रुपाली आंडोळे ,सुनील दारोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रभाग क्र. ९ चे एस.आर.पी.एफ. वडाळी स्‍वास्‍थ्य निरीक्षक सुमेध मेश्राम, भाऊराजसिंग टांक, रवींद्र चोरपगार, सागर डोंगरे, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Greetings to the students by giving ‘Corona Balveer’ medal