शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा पदवीदान समारंभ

By admin | Updated: October 24, 2016 00:13 IST

आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण सुसंस्कार व आदर्श जीवनाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक होईल.

राष्ट्रसंत पुण्यतिथी उत्सव : समग्र वाङ्मयावर आधारितगुरुकुंज मोझरी : आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण सुसंस्कार व आदर्श जीवनाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक होईल. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र वाङ्मयावर आधारित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. शाळेत व शाळेच्याबाहेरसुद्धा या जीवन विकास परीक्षेचा उपक्रम राबविला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात जीवन विकास परीक्षेच्या ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन संचालक मंडळाच्या सदस्या पुष्पा बोंडे यांनी केले. यावेळी सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, वऱ्हाडी कवी जयंत चावरे, संस्कार भारतीचे विवेक कवटेकर, रामकृष्ण अत्रे, दिनकर येवलेकर, दीपक पुनसे, ममता इंगोले, ताराचंद कठाळे, अशोक कोठारी उपस्थित होते. यावेळी विजयालक्ष्मी थोटे, शीतल ठाकरे, वैशाली चौधरी, प्रणिती मिलके, शीतल कांडलकर, मंजूषा कविटकर, सरला येंडे, कल्पना जामगडे, जया सावरकर, लिला सावळीकर, करुणा हांडे, उज्ज्वला गमे, वसुधा उमरकर, योगेश गावंडे, विशाल बोरकर, देवीदास खडसे, रामकृष्ण गावंडे, रवींद्र काळबांडे, सुनील देशमुख, गजानन गाठेकर, नारायण कवटकर, मोरेश्वर माकडे यांना ग्रामगीताचार्य पदवी व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाचे सचिव गुलाब खवसे यांनी केले. अहवाल वाचन केशवदास रामटेके यांनी केले. गोपाल कडू यांनी आभार व्यक्त केले. (वार्ताहर)कार्यकर्त्यांचा सत्कारराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात श्रीगुरुदेव सेवामंडळाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष एस. एन. सुब्बाराव होते. महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष व कल्याणचे आ.जगन्नाथ शिंदे, चंद्रपूरचे आ. नानाजी शामकुळे, उद्योजक एकनाथराव दुधे, सह्यांद्री दूरदर्शन केंद्राचे निर्देशक चंद्रमोहन नंदनपवार, नांदेड जिल्ह्यातील स्वच्छता दूत माधवराव झरीकर, निवृत्त अधीक्षक अभियंता प्रल्हाद भारती, केम प्रोजेक्टचे संचालक गणेश चौधरी, साहित्यिक भास्कर अरबट, वाशिमचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी ए. एम. यावलीकर, जगन्नाथ गावंडे, यादवराव मोहनकर, नानाजी नंदावरे, दीपक गोरे, ज्ञानेश्वर जवणे, श्याम कर्डीकर, केवलराम पंधरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रचार सेवाधिकारी बबनराव वानखेडे यांनी केले. संचालन रुपेश राऊत, आभार प्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.