शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

४२ क्रीडाप्रकारांसाठी मिळणार ‘ग्रेस मार्क’

By admin | Updated: April 1, 2016 23:57 IST

इयत्ता १०, १२ वी मधील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दिले जाणारे क्रीडा सवलतीचे वाढीव गुण (ग्रेस मार्क) ४२ खेळांसाठी दिले जाणार आहेत.

१०, १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सवलत : ३० एप्रिलपर्यंत प्रस्तावाची मुदतअमरावती : इयत्ता १०, १२ वी मधील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दिले जाणारे क्रीडा सवलतीचे वाढीव गुण (ग्रेस मार्क) ४२ खेळांसाठी दिले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या खेळाडंूनाच १५, २० असे ग्रेस मार्क दिले जाणार आहेत.शालेय क्रीडा स्पर्धेत सुमारे ९२ खेळांचा समावेश आहे. यापैकी ४२ खेळांतील राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंनाच वाढीव गुण देण्याचा निर्णय क्रीडा व युवक संचालनालयाने घेतला आहे. शासनाने क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबतच्या सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी सन २०१५-१६ शालेयसत्रापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षांपासून क्रीडागुण सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र एकविध खेळ संघटना, विभागीय उपसंचालक तसेच जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडागुण सवलतींचे प्रस्ताव स्वीकारत नसल्याची तक्रार खेळाडू व पालकांनी क्रीडा संचालनालयाकडे केली आहे. त्यामुळे त्वरित प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश क्रीडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संघटनांद्वारे प्राप्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील सहभागी व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंच्या नावांचा प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळांना गुणांच्या शिफारशीसहित ३० एप्रिलपर्यंत सादर करता येणार आहे. यामुळे क्रीडापटू आनंदलेत.(प्रतिनिधी)वाढीव गुणांमध्ये या खेळांचा समावेशअ‍ॅथेलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बेसबॉल, बुद्धिबळ, क्रिकेट विनू मंकड, क्रिकेट सी.के. नायडू, सायकलिंग रोडरेस, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, ज्युदो, कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, नेटबॉल, रोलर स्केटिंग, रोलर हॉकी, रोलबॉल, रायफल शूटिंग,जलतरण, डायव्हिंग, सॉफ्टबॉल, टेबलटेनिस, तायक्वांडो, व्हॉलिबॉल, कुस्ती, वेटलिफ्टिंग, योगा, सुब्रतो कप फु टबॉल, नेहरु कप हॉकी, मल्लखांब, बॉलबॅडमिंटन, कॅरम, डॉजबॉल, किक बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट, थ्रो-बॉलअसे मिळतील गुणराज्यस्तरीय सहभाग- १५ गुणराज्यस्तरीत प्रावीण्य- २० गुणराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग- २० गुणराष्ट्रीय स्पर्धेत प्रावीण्य- २५ गुणआंतरराष्ट्रीय सहभाग व प्रावीण्य- २५ गुणराज्य स्पर्धेत पहिले तीन संघ- २० गुण राज्य स्पर्धेत उर्वरित पाच संघ- १५ गुणशाळा-विद्यालयांनी ग्रेस गुणांसाठी १५ एप्रिलपर्यंत क्रीडा विभागाला प्रस्ताव सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांचा प्रस्ताव बोर्डाकडे क्रीडा विभागाकडून पाठविला जाईल. - अविनाश पुंडजिल्हा क्रीडा अधिकारी