शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासन युतीचे योजना आघाडीच्याच!

By admin | Updated: January 5, 2016 00:12 IST

राज्यातील आघाडी शासन पायउतार होऊन आता एक वर्ष झाले. नव्या युती सरकारने नवे धोरण, नव्या योजना जाहीर करून ...

माहिती पुस्तिका धूळ खात : नव्या पुस्तकांची अद्यापही प्रतीक्षा कायमचअमरावती : राज्यातील आघाडी शासन पायउतार होऊन आता एक वर्ष झाले. नव्या युती सरकारने नवे धोरण, नव्या योजना जाहीर करून आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अद्यापही आघाडी शासनाचीच ओळख कायम ठेवल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती, नवबौद्ध, मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अशा विविध समाज घटकातील लाभार्थ्यासाठी योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे. शिष्यवृत्ती शिवाय इतर योजनाही राबविल्या जातात. या योजना त्या त्या समाज घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. मात्र मागील आघाडी शासनाच्या कार्यकाळातील माहिती पुस्तिकाच अमरावतीत नव्हे बऱ्याच ठिकाणी समाजकल्याण विभागात माहिती पुस्तिका आघाडी शासनाचीच पडून आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना त्याचा लाभ याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना समाजकल्याण विभागाकडून आघाडी शासनाच्या काळातील पुस्तिकाच दिली जाते. याच योजना सुरू असल्याचे या विभागाकडून सांगितले जाते. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता शिष्यवृत्ती व इतर घटकांसाठीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. यासाठी जी माहिती पुस्तिका आहे त्यामुळे ही पुस्तिका वितरित केली जात नाही. (प्रतिनिधी)दोष कुणाचा ?राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर युती शासनाने विविध योजना नव्या धोरणाचा सपाटा लावला या प्रक्रियेत सामाजिक न्याय विभागातील नव्या योजनांचा समावेश झाला नाही का, नव्या योजना आल्या असतील तर त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. यात नेमका दोष शासनाचा की त्या त्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचा हाही प्रश्न यानिमित्याने उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही आघाडीचेचसमाज कल्याण विभागातर्फे जी माहीती पुस्तिका उपलब्ध आहे या पुस्तिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, हे आघाडी शासन काळातील अर्थात पृथ्वीराज चव्हाण, अजीत पवार, शिवाजीराव मोघे यांचा नावाचा आहे.