शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राणा लॅण्डमार्कच्या जप्त मालमत्तेवर शासनाची अधिसूचना

By admin | Updated: May 2, 2016 00:06 IST

राणा लॅण्डमार्क प्रा.लिमिटेडच्या १८ कोटी रुपयांच्या जप्त मालमत्तेबाबत गृहविभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

१८ कोटींची मालमत्ता जप्त : ठेवीदारांना दिलासाअमरावती : राणा लॅण्डमार्क प्रा.लिमिटेडच्या १८ कोटी रुपयांच्या जप्त मालमत्तेबाबत गृहविभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १० कोटी रुपयांच्या या फसवणूक प्रकरणात यापुढे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन सन १९९९ मधील तरतुदीनुसार करवाई करावी, अशा सूचना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.सन २०१४ मध्ये शरद भीमरावजी कुकडे या ग्राहकाच्या तक्रारीवरून राणा लॅण्डमार्क प्रा.लि.चे संचालक व एजंटविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली गेली. त्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ४०३, ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४ सहकलम २, एसपीआयडी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.कमी दरात फ्लॅट देण्याच्या बतावणीकरून राणा लॅण्डमार्कच्या संचालक, एजंटने जवळपास ५०० ग्राहकांकडून इसार रक्कम घेऊन १० कोटी रुपयांची फवसणूक केली. यात योगेश राणासह, जिचकार, आणि अभय शिरभाते यांना अटक करण्यात आली होती, तर अभिजित लोखंडे व चंद्रशेखर राणा यांना जामीन मिळाला होता. या प्रकरणात आतापर्यंत दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेत. याशिवाय अंतिम दोषारोपपत्र या आठवड्यात दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)ईडीकडे अहवालराणा लॅण्डमार्क प्रा.लि. ने १० कोटीची फसवणूक केली, तर आरोपींकडून १८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात मनी लॉण्ड्रींग तसेच या हाऊसिंग डेव्हल्पमेंटचे कलम लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुढील कारवाईबाबत सक्तवसुली संचालनालय ईडीला अहवाल पाठविण्यात आला आहे.उपविभागीय अधिकारी सक्षम प्राधिकारीएमपीआयडीचे कलम ४ नुसार जप्त मालमत्तेची विल्हेवाट लावण्याकरिता प्रशासक नेमण्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, अमरावती यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता गृहविभागने जप्त मालमत्ते बाबत अधिसूचना काढल्याने ठेवीदारांची रक्कम मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.प्रक्रियेला वेगसंचालकांच्या नावावरील मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना गृहविभागाने कोढल्याने ५०० हून अधिक ठेवीदारांना त्यांची गुंतविलेली रक्कम प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत परत देण्याच्या प्रक्रियेला या अधिसुचनेने वेग येणार आहे.