शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भिजलेल्या धान्याचे बाजारभावाने पैसे द्या

By admin | Updated: October 11, 2016 00:16 IST

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला १०० ते २०० पोते माल भिजला.

सुनील वऱ्हाडेंचे आदेश : बाजार समितीत पावसाचा कहरअमरावती : अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला १०० ते २०० पोते माल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली. पण ज्या शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप झाले, त्यांना खरेदीदारांना खरेदी केलेल्या भावनेचे पैसे द्यावे, अशी सूचना बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान अंबानगरीत धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे बाजार समितीत विक्रीस आलेला मूग, उडीद व सोयाबीनचे शेकडो पोते भिजले. मूग व उडदाची हर्रास संपली होती. सोयाबीनची हर्रास व खरेदी सुरू असतानाच पावसाचे आगमन झाल्यामुळे अडते, व्यापारी व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. परंतुु ८० टक्के शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी आटोपली होती, असे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदारांनी ज्या शेतकऱ्यांचा माल विकत घेतला तो माल ओला झाला असला तरी त्याला ज्या भावाने खरेदी केला गेला त्या मालाचे त्याच भावाने पैसे देण्यासाठी अडते व व्यापाऱ्यांची तातडीची बैठक सभापती वऱ्हाडे यांनी बाजार समितीत घेतली. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने पाऊल उचलले. अनेक शेतकऱ्यांचा माल ओला झाला. चांदूरबाजारचे सुरेश शिंगाडे, पिंपरी मोडकचे सुनील मोडक, एकनाथ गवई, कसबेगव्हाणचे गजानन जोगी व इतर अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. खरेदीदार माल कमी भावात घेत असल्याचा आरोप त्यांनी 'लोकमत'श्ज्या शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर ओला झाला. त्या शेतकऱ्यांना खरेदी भावानुसार पैसे देण्याच्या सूचना अडते व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना न्याय मिळावे, हाच माझा उद्देश आहे. - सुनील वऱ्हाडे, सभापती बाजार समिती, अमरावती