भिजलेल्या धान्याचे बाजारभावाने पैसे द्या

By Admin | Updated: October 11, 2016 00:16 IST2016-10-11T00:16:53+5:302016-10-11T00:16:53+5:30

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला १०० ते २०० पोते माल भिजला.

Give money to the market of soaked grains | भिजलेल्या धान्याचे बाजारभावाने पैसे द्या

भिजलेल्या धान्याचे बाजारभावाने पैसे द्या

सुनील वऱ्हाडेंचे आदेश : बाजार समितीत पावसाचा कहर
अमरावती : अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला १०० ते २०० पोते माल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली. पण ज्या शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप झाले, त्यांना खरेदीदारांना खरेदी केलेल्या भावनेचे पैसे द्यावे, अशी सूचना बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान अंबानगरीत धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे बाजार समितीत विक्रीस आलेला मूग, उडीद व सोयाबीनचे शेकडो पोते भिजले. मूग व उडदाची हर्रास संपली होती. सोयाबीनची हर्रास व खरेदी सुरू असतानाच पावसाचे आगमन झाल्यामुळे अडते, व्यापारी व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. परंतुु ८० टक्के शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी आटोपली होती, असे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदारांनी ज्या शेतकऱ्यांचा माल विकत घेतला तो माल ओला झाला असला तरी त्याला ज्या भावाने खरेदी केला गेला त्या मालाचे त्याच भावाने पैसे देण्यासाठी अडते व व्यापाऱ्यांची तातडीची बैठक सभापती वऱ्हाडे यांनी बाजार समितीत घेतली. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने पाऊल उचलले. अनेक शेतकऱ्यांचा माल ओला झाला. चांदूरबाजारचे सुरेश शिंगाडे, पिंपरी मोडकचे सुनील मोडक, एकनाथ गवई, कसबेगव्हाणचे गजानन जोगी व इतर अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. खरेदीदार माल कमी भावात घेत असल्याचा आरोप त्यांनी 'लोकमत'श्

ज्या शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर ओला झाला. त्या शेतकऱ्यांना खरेदी भावानुसार पैसे देण्याच्या सूचना अडते व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना न्याय मिळावे, हाच माझा उद्देश आहे.
- सुनील वऱ्हाडे, सभापती बाजार समिती, अमरावती

Web Title: Give money to the market of soaked grains