शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणचे ड्रोनद्वारे जीआयएस सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

अमरावती : विविध कारणांनी फेरफाराची प्रकरणे कित्येक दिवस प्रलंबित राहतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावठाणातील जमिनींचे ...

अमरावती : विविध कारणांनी फेरफाराची प्रकरणे कित्येक दिवस प्रलंबित राहतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावठाणातील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे संयुक्तपणे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमिअभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारीे दिले.

नियोजन भवनात भूमिअभिलेख विभागाद्वारे गावठाणातील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण तसेच ड्रोनद्वारे गावठाण भूमापन या उपक्रमाबाबत अमरावती विभागातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

भारतीय सर्वेक्षण विभाग, ग्रामविकास विभाग यांच्या सहकार्याने भूमिअभिलेख विभागामार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करून प्रतिमांचे भूसंदर्भीकरण व अधिकृतता करण्यात येईल. गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाण भूमापन होऊन मिळकत पत्रिका, अधिकार अभिलेख संबंधितांना मिळणार असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.

सर्वेक्षणासह गावठाणातील मिळकतींचा डिजिटलाईज्ड नकाशा तयार करण्यात येईल. त्याला ग्रामपंचायतींचे मिळकत रजिस्टर जोडण्यात येईल. गावाच्या गावठाण हद्दीतील मिळकतींची नियमाप्रमाणे मालकी हक्काची चौकशी करण्यात येऊन, त्याबाबत आज्ञावली विकसित करून मिळकत पत्रिका व सनद भूमिअभिलेख विभागाद्वारे तयार करण्यात येईल व जनतेस सनद सशुल्क देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बॉक्स

१२ हजार दस्तांचे डिजिटायझेशन बाकी

विभागाचे १२ हजार दस्तांचे डिजिटायझेशन बाकी आहे. डिजिटल स्वाक्षरी न झालेले फेरफाराची संख्या ९५,७३८ आहे. २६ अहवालांची नोंद घेऊन विसंगत असलेल्या प्रलंबित सात-बारांची संख्या १९,८४६ आहे. ई-हक्कमधील प्रलंबित अर्ज ९०२ आहे. दस्तावेजांची अचूक नोंदणी, विसंगती २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश चोक्कलिंगम यांनी दिले.

बॉक्स

ई- पीक पाहणी

शेतीचे सातबारावरील क्षेत्र तसेच बिगर शेती क्षेत्रासंदर्भात अहवाल ३१ नुसार विशेष शिबिराचे आयोजन व त्याद्वारे नोंदी करून दस्तांचे डिजिटायझेशन करावे. या माध्यमातून गावठाण व इतर वनजमिनीवरील मालकी हक्कासंदर्भातील दस्त नोंदणी ही अचूक पद्धतीने होऊन त्या मालमत्तेचे पी.आर. कार्ड संबंधितांना उपलब्ध होणार असल्याचे चोक्कलिंगम म्हणाले.