शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विकासकामे तातडीने पूर्ण करा!

By admin | Updated: January 4, 2017 00:19 IST

शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी अपूर्ण व प्रस्तावित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, ...

पालकमंत्र्यांचे निर्देश : महापालिकेच्या कामांचा आढावा अमरावती : शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी अपूर्ण व प्रस्तावित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध विकासकामांचा व योजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त हेमंत पवार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी तसेच मनपातील सर्व विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, अमृत योजना, भुयारी गटार योजना, हागणदारीमुक्त अभियान, स्वच्छ भारत अभियान, पाणीपुरवठा योजना, रमाई आवास योजना आदी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. या योजनांची शहरात अमंलबजावणी करावी. राजापेठ उड्डाणपूल, शिव टेकडी, भीम टेकडी, वडाळी तलाव व उद्यान, प्रमुख रहदारीचे रस्ते आदींची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावी. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरातील ज्या प्रभागात शौचालयाची कामे प्रलंबित आहेत अशा कुटुंबांची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधणीसाठी अनुदान उपलब्ध करावेत. मनपाच्या अधिनस्त असलेल्या शाळांची अवस्था व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळेतील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी बेंचेस आदी सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात. विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी मागणीचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवून व त्याचा पाठपुरावा करा. महानगरपालिकांकडे विविध महसूल गोळा करण्याचे माध्यम आहे. या अनुषंगाने मनपाची आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी एलबीटी कर, मालमत्ता कर, होर्डींग्स कर यासह इतर महसूल जमा करण्याच्या बाबींवर लक्ष ठेवण्यात यावे. शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी. सर्व नाल्यांचे खोलीकरण व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी, अशा सूचना पोटे यांनी बैठकीत दिल्या. पंतप्रधान आवास योजना, अंबादेवी-एकवीरादेवी विकास, नगरोत्थान योजना, परकोट सौंदर्यीकरण, त्रिवेणी अभियान, अनधिकृत बांधकाम, अंबानाला, वडाळी तलाव सौंदर्यीकरण आदींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.