सामान्य प्रशासन, पंचायत विभागात खांदेपालट

By Admin | Updated: May 20, 2014 23:17 IST2014-05-20T23:17:21+5:302014-05-20T23:17:21+5:30

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पंचायत विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या दीडशेहून अधिक जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

General Administration, Khandepalat in Panchayat section | सामान्य प्रशासन, पंचायत विभागात खांदेपालट

सामान्य प्रशासन, पंचायत विभागात खांदेपालट

अमरावती : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पंचायत विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या दीडशेहून अधिक जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत तसेच पंचायत समिती स्तरावर कार्यरत वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, अधीक्षक, कक्ष अधिकारी, परिचर, विस्तार अधिकारी (सांखिकी) अशा सुमारे शंभरहून अधिक कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या कर्मचार्‍यांची सेवा मेळघाटात झाली नाही अशा कर्मचार्‍यांना प्रशासकीय बदलीने मेळघाटात व इतर तालुक्यात रिक्त पदानुसार पदस्थापना देण्यात आली आहे. याशिवाय पंचायत विभागांतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील २४ ग्रामसेवकांच्या प्रशासकीय, २0 विनंती आणि ९ ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीपात्र कर्मचार्‍यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, विधवा, विनंती, आपसी अश्यही बदल्या कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार पूर्ण करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या १८ मे पासून वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी पार पडलेल्या बदली प्रक्रियेला जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डब्ल्यू. दिवाण, अरुण मोहोड आदी अधिकार्‍यांसह प्रशासकीय कामकाज हाताळण्यासाठी पंकज गुल्हाने, समीर चौधरी, अमोल कावरे, नीलेश तालन, किशोर राठोड, लिलाधर नाल्हे, अनुप टाले, पंचायत विभागाचे प्रशांत धर्माळे, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर यांनी काम पाहिले. बदली प्रक्रियेला जिल्ह्यातील बदलीपात्र कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात गर्दी केली होती. बदल्यांमुळे कर्मचार्‍यांमध्ये कहीं खुशी, कहीं गमअसे वातावरण पहावयास मिळाले बुधवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचार्‍याच्या प्रशासकीय, विनंती, आपसी, बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, वरिष्ठ सहायक कनिष्ठ सहायक आदी कर्मचार्‍याचा समावेश आहे. या बदल्याकडे आरोग्यातील कर्मचार्‍याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: General Administration, Khandepalat in Panchayat section