शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजारात साडेपाच लाखांचा जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

फोटो - चांदूर बाजार २७ एस १३ जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा, चांदूर बाजार पोलिसांची संयुक्त कारवाई फोटो - ...

फोटो - चांदूर बाजार २७ एस

१३ जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा, चांदूर बाजार पोलिसांची संयुक्त कारवाई

फोटो - चांदूर बाजार २७ एस

चांदूर बाजार - स्थानिक रामभट्ट प्लॉट परिसरात अमरावती ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व चांदूर बाजार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत साडेपाच लाख रुपयांचे साहित्य जुगार अड्ड्यावरून ताब्यात घेण्यात आले, शिवाय १३ जणांना अटक करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी ही कारवाई करण्यात आली.

चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी घरफोडी, मोटरसायकल चोरीतील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना शहरातील राम भट प्लॉट येथे काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली असता, एकूण १३ आरोपी मिळून आले. त्यांच्या ताब्यातून १ लाख ५७ हजार १९० रुपये रोख, ९७ हजार ५०० रुपयांचे १३ मोबाइल, तीन लाखांच्या दुचाकी व इतर १ हजार ४५० रुपये असा एकून ५ लाख ५६ हजार ५४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चांदूर बाजार ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. येथून स्वप्निल डवरे (४०), विलास जाधव (३५), राजू धर्माळे (४७), रफीक खान (३६), देवेंद्र हरबास (३६), अनवर अली (४५), शेख अहमद (४०), वहीद खान (४५), रेहान खान (३४), अझरुद्दीन इनामदार (३५), मनोज बंड (४०), गोविंद गतफने (४०), अन्सार अहमद (४५, सर्व रा. चांदूर बाजार) यांना अटक करण्यात आली.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, हेडकॉन्स्टेबल त्र्यंबक मनोहरे, नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद खर्चे, स्वप्निल तंवर व नीलेश डांगोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंबाडकर तसेच चांदूर बाजारचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर व त्यांच्या ताफ्याने केली.

--------------

मोझरीनजीक पकडला चार लाखांचा जुगार

- १० दुचाकी जप्त, २० आरोपींवर गुन्हे दाखल, चार पसार

तिवसा : दासटेकडीच्या मागील बाजूला पडीक शेतात तिवसा पोलिसांनी धाड टाकून १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २५ जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस सूत्रांनुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीच्या मागील बाजूला एका शेतात जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी १२ पासून तिवसा पोलिसांचे पथक जुगार खेळणाऱ्या परिसरात सापळा रचून होते. दुपारी ५ वाजता नजरेस न येता पोलिसांनी जुगाराचे ठिकाण गाठला. येथून १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींसह १० दुचाकी, मोबाईल व रोकड असा एकूण ४ लाख २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. घटनास्थळाहून चार आरोपींनी पलायन केले.

आरोपींमध्ये तिवसा, माहुली जहागीर, मोझरी येथील जुगाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, नायक पोलीस कॉन्स्टेबल अरविंद गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश साव, विशाल करूले, भूषण चंदेल, भूषण नंदरधने, राजेंद्र चव्हाण यांनी केली.