शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांकडून मिळाला सेवेचा गुरूमंत्र

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीशेजारी मोर्शी तालुक्यात चुडामण नदीच्या तिरावर वसलेल्या वरुड गावी पौष वद्य षष्ठी शके १८४५ ला म्हणजे रविवार २७ जानेवारी १९२४ रोजी सूर्यास्ताच्यावेळी प्रतिष्ठित वकील

अमरावती : राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीशेजारी मोर्शी तालुक्यात चुडामण नदीच्या तिरावर वसलेल्या वरुड गावी पौष वद्य षष्ठी शके १८४५ ला म्हणजे रविवार २७ जानेवारी १९२४ रोजी सूर्यास्ताच्यावेळी प्रतिष्ठित वकील कुटुंबातील श्रीधरपंत व अन्नपूर्णाबाई या दाम्पत्याच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आले. पुढे हेच बालक ‘अच्युत महाराज’ या नावाने प्रसिध्द होऊन विदर्भात वंदनीय ठरले. रविवारी त्या वंदनीय संत अच्युत महाराजांचा दुसरा पुण्यस्मरण दिन.१९३७ साली वरुडमधील सातपुडा पर्वताच्या नागठाणा वनस्थळी चुडामण नदीकाठी साधकांना घेऊन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी चातुर्मासात निवास केला होता. त्यावेळी वडिलांसोबत अच्युत महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दर्शनाचा योग आला. अश्विन वद्य द्वितीयेला म्हणजे १७ आॅक्टोबर १९४१ रोजी अच्युत महाराज वरखेडक्षेत्री श्रीसंत आडकोजी महाराज संस्थान येथे पोहोचले. २० आॅक्टोबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही तेथे पोहोचले आणि त्यांनी अच्युत महाराजांना पोटाशी धरले. पुढे राष्ट्रसंतांनी वरखेडच्या शेजारीच वर्धा तटाकाठी अरण्यात झोपडी बांधून दिली आणि सभोवती असणाऱ्या साधू सज्जनांची ओळख करुन दिली. त्यांच्यातील संतत्व राष्ट्रसंतांनी ओळखली होती.