शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
4
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
5
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
6
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
7
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
8
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
9
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
10
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
11
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
12
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
13
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
14
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
15
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
16
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
17
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
18
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
19
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
20
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मधील गावे हागणदारीमुक्त करा

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट झालेली गावे हागणदारीमुक्त करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी ....

जिल्हाधिकारी : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणीतिवसा : जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट झालेली गावे हागणदारीमुक्त करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी जिल्हावासीयांना केले. तिवसा तालुक्यातील मोझरी येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.जलयुक्त शिवार अभियानात पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधीही खर्च करीत आहे. मात्र ज्या गावांमध्ये अशी कामे सुरु आहेत, त्यातील काही गावांमध्ये आजही हागणदारी अस्तित्वात आहे. जलयुक्त शिवार अभियानात जास्तीत जास्त लोकसहभाग अभिप्रेत असून यामध्ये समाविष्ट गावांनी यानिमित्ताने गाव हागणदारीमुक्त करण्यावर भर द्यावा व प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी ग्रामस्थांना केले. मोझरी व गुरुदेवनगर येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांची जिल्हाधिकारी व आमदारांनी पाहणी केली. मोझरी येथील सूर्यगंगा नदीवरील वसंत बंधारा, कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, तसेच गुरुदेव नगरातील सिमेंट नाला बांध आदींची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी ग्रामस्थांनी एक पंचमांश रक्कम लोकवर्गणीतून जमा करावी. उर्वरित चार पंचमांश रक्कम शासन देईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसहभागातून गाव हागणदारीमुक्त करणे ही फारशी कठीण बाब नाही. त्यासाठी सर्वव्यापी प्रयत्नांचीच फक्त गरज आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी गीत्ते यांनी सांगितले. यावेळी गुरुदेवनगर येथे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्या हस्ते सिमेंट नाला खोलीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. नाला खोलीकरण करताना काढलेली माती पुन्हा नाल्यात जाऊ नये यासाठी माती धरुन ठेवणारी झाडे काठावर लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.यावेळी माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, तांत्रिक कृषी पर्यवेक्षक सचिन निस्ताने तसेच महसूल, कृषी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गुरुदेवनगर व मोझरीचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.