शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

चार तासांनंतर मसन्याऊद कैद

By admin | Updated: May 11, 2016 00:35 IST

जंगलात राहणारा एरवी नागरिकांच्या वस्तीत कधी न आढळणारा मसन्याऊद (उतमांजर) हा प्राणी शहरात आल्याने एकच खडबड उडाली.

नागरिकांची तोबा गर्दी : वनविभागाने चालविले 'रेस्क्यू आॅपरेशन'दर्यापूर : जंगलात राहणारा एरवी नागरिकांच्या वस्तीत कधी न आढळणारा मसन्याऊद (उतमांजर) हा प्राणी शहरात आल्याने एकच खडबड उडाली. मंगळवारी त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे चार तास 'रेस्क्यू आॅपरेशन' चालले. त्यानंतर त्याला कैद करण्यात यश मिळविले. अतिशय दुर्मिळ असलेल्या मसन्याऊद बघण्यासाठी दर्यापूरकरांनी गर्दी केली होती.माणसाचा मृतदेह जर एखाद्या ठिकाणी गाडला असेल तर त्याला पूर्णपणे उखरण्याची ताकद या मसन्याऊदमध्ये असल्याचे जानकार सांगतात. त्यामुळे ज्या ठिकाणी मनुष्याचा मृतदेह गाढल्या जातो, त्या ठिकाणी प्रामुख्याने हे आढळतात. मंगळवारी सकाळी स्थानिक प्रबोधन गीता मंडळ शाळेजवळील एका कडू लिंबाच्या झाडावर दोन मसन्याउद (उतमांजर इंग्रजीमध्ये त्याला सिवेट कॅट) असे म्हणतात हे आढळून आले आहे. काही नागरिकांची नजर त्यांच्यावर गेल्यानंतर जंगली मांजरीप्रमाणे दिसणारा हा प्राणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढत गेली. रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने आणि बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे पोलीस स्टेशन, नगर पालिका रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अंदाजे सकाळी ९ वाजता दोन मसन्याऊद झाडावर चढले. मसन्याउद आल्याची चर्चा गावभर पसरली. त्यामुळे हजारो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परतवाडा वनविभागाचे वनपाल गजानन आमले, वनरक्षक यांना पाचारण करण्यात आले. झाडावरून दोन्ही मसन्याऊदला पकडणे कठीण असल्याने पारधी आणि भोई बांधवांना बोलविण्यात आले. शिकारी जाळे घेवून त्यांनी ११ वाजताच्या दरम्यान मसन्याउदाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु एक मसन्याऊद पळून गेला तर दूसरा हा लिंबाच्या झाडावरुन उडया मारत आनंद महाजन यांच्या घराजवळ गेला. त्याला जाळ्यात पकण्यात चार तासानंतर यश आले. दरम्यान, दोन ते तीन लोकांना नखाचे घाव देऊन त्याने जखमीही केले. यावेळी गोेकुल चव्हाण या हाताने अपंग असलेल्या युवकाने धाडस करुन मसन्याऊदला कैद केले तर त्याला कैलास चव्हाण, बाळू चव्हाण, वसंत नांंदणे, रामेश्वर कुरवाडे, संजय सोळंके, गोपाल चव्हाण, काशीनाथ चव्हाण यांनी या आॅपरेशन मध्ये मदत केली. यावेळी वर्ल्ड अ‍ॅनीमल, वसा ग्रुप या संघटनेचे शुभम सोळंके व त्याचे सहकारी याठिकाणी प्राणी मित्र म्हणून दाखल झाले होते. वाहतूक पोलीस बोंडे, मंगेश अघडते, हनुमंत सोळंके, अर्जून मुंढे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाचे सहकार्य बजावले. (प्रतिनिधी)