शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची भेट , मेळघाटात गोपनीय दौराही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हा संकल्प घेतला होता. त्या अनुषंगाने मेळघाटात महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर प्रकरणातील क्रौर्य पुढे आले. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने उच्चस्तरीय चौकशीसाठी पाठपुरावा केला. परिणामी श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार आज गजाआड आहेत, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले. दीपालीच्या मोरगाव येथील निवासस्थानी भेट देतानाही याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हटले होते. प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देताना, सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. कर्मठ पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक हा या पाठपुराव्याचा परिपाक आहे. दोषींवर थेट कारवाई व्हावी, असे निर्देश सरवदे यांना दिले होते. जलदगती निष्पक्ष चौकशीची अपेक्षा त्यांनी पूर्ण केली, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही रेड्डींनी गांभीर्याने घेतले नाहीदीपाली यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्याकडून काही निवेदने प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रेड्डी यांना पत्र दिले. परंतु, रेड्डींनी प्रतिसाद दिला नाही. आत्महत्याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी सुरुवातीपासूनच होती. त्यानुसार अगोदर विनोद शिवकुमार व आता रेड्डी यांना अटक झाली आहे. राज्य सरकारने कुणालाही वाचविण्याच्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग