बालिकेवर अत्याचारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:01 IST2017-08-19T05:01:38+5:302017-08-19T05:01:40+5:30

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला पाच वर्षे कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

 Five years of punishment for child abuse | बालिकेवर अत्याचारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

बालिकेवर अत्याचारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

वरूड (अमरावती) : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला पाच वर्षे कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती क्र. ३ यांनी हा निर्णय दिला. उत्तम चंद्रभान गाडगे (३७, रा. उदापूर) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सात आरोपींची साक्ष नोंदविली. आरोपीवरील सर्व दोष सिद्ध झाल्यामुळे त्याला पाच वर्षे कारावास, पाक्सो कायद्यांतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला़

Web Title:  Five years of punishment for child abuse