शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

By admin | Updated: March 27, 2017 00:03 IST

दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच आरोपींना कोतवाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री खापर्डे बगिचा परिसरातून अटक केली.

खापर्डे बगिचातील घटना : तलवार, चाकू, तिखट जप्तअमरावती : दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच आरोपींना कोतवाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री खापर्डे बगिचा परिसरातून अटक केली. रोशन गुलाब मगरे (२४, महेंद्र कॉलनी), अभिजीत किसन तायवाडे (२६, छत्रसालनगर), अक्षय उत्तम ढोले (२३, रमाबाई आंबेडकरनगर), सूरज प्रकाश इंगोले (२०, कपिलवस्तूनगर) व रवि किसन खडसे (२५, बेलपुरा), अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नरेश मुंडे यांच्या पथकातील पोलीस नाईक अब्दुल कलाम, गजानन ढेवले, सागर ठाकरे, प्रफुल्ल खोब्रागडे व विनोद भगत शनिवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास खापर्डे बगिचा परिसरात गस्तीवर असताना त्यांना काही युवक अंधारात लपून बसल्याचे आढळून आले. पूर्वाश्रमीचे गुन्हे तपासणार अमरावती : पोलिसांनी तत्काळ सापळा रचून यापाच जणांना घेराव घालून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याजवळ तलवार, दोन चाकू, एक स्टेपनी व तिखट असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून ठाण्यात नेले. रविवारी पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाचही जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी शहरात नेमके कोणत्या ठिकाणी दरोडा टाकणार होते, यापूर्वी त्यांनी काही दरोडे टाकलेत का, आरोपी रेकार्डवरील आहेत का, असे अनेक प्रश्न पोलीस चौकशीनंतर उघड होणार आहे. रवी खडसेवर चोरीचे गुन्हेसराईत गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवि खडसे याच्यावर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपींमध्ये रवी खडसेचाही सहभाग असल्यामुळे चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.पेट्रोलिंगदरम्यान पाच जण अंधारात लपून बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्याजवळ आढळून आलेल्या साहित्यावरून निदर्शनास आले. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.- नीलिमा आरज, प्रभारी पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.