शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पाच तास बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:14 IST

नरेंद्र जावरे फोटो - २७एएमपीएच२१ कॅप्शन - दीपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानाची पाहणी करताना प्रज्ञा सरवदे, राजेश तेंडुलकर आदी ...

नरेंद्र जावरे

फोटो - २७एएमपीएच२१

कॅप्शन - दीपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानाची पाहणी करताना प्रज्ञा सरवदे, राजेश तेंडुलकर आदी

हरिसाल (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांच्या चौकशीसाठी आलेल्या अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी मंगळवारी धारणी तालुक्यातील हरिसाल येथे तब्बल पाच तास वन अधिकारी-कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत केली. यादरम्यान ज्यांचे बयान आहे, तो आणि आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याशिवाय कुणालाच आत प्रवेश नव्हता.

अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे मुंबईहून सोमवारी अमरावती येथे आल्यावर मंगळवारी त्यांनी सकाळी ११.३० वाजता हरिसाल येथे दीपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर दुपारी १२ पासून थेट ५ पर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत बंदद्वार चर्चा करून प्रत्यक्ष त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिलेले बयान योग्य आहे किंवा नाही, याची चाचपणी केली.

बॉक्स

वन बाय वन एन्ट्री

हरिसाल येथील निसर्ग निर्वचन संकुलात मंगळवारी अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी मुंबई वरून आलेल्या अधिकाऱ्यांनाही सोबत न घेता स्वतः वन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी एकांतात चर्चा केली. एपीसीसीएफवरील आरोपांची चौकशी असल्याने त्यासंदर्भात त्यांनी दिलेल्या बयानासंदर्भात खातरजमा केली. व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी किंवा इतर कुणालाच या दरम्यान एन्ट्री मिळाली नाही.

बॉक्स

कारवाईच्या शोकॉज जायच्या रेड्डींकडे

गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार अधिकाऱ्यांना कुठल्याही बाबतीत त्रास द्यायचा. कारवाईसंदर्भात दिलेल्या कारणे दाखवा नोटीस एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यालयाकडे पाठवायचा व तेथून अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायची. इतर कागदपत्रे उपवनसंरक्षक कार्यालयातच पडून राहत असल्याचा एक खुलासा या चौकशीदरम्यान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बॉक्स

१५ कर्मचारी, सहा अधिकाऱ्यांचे बयान नोंदविले

मंगळवारी गुगामल वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक राजकुमार पटवारी, चिखलदरा आरएफओ मयूर भैलुमे, ढाकना आरएफओ हिरालाल चौधरी, तारुबांदाचे आरएफओ सुहास मोरे, फिरते पथक तथा हरिसालचे प्रभारी आरएफओ पी.एम. ठाकरे या अधिकाऱ्यांसह १५ पेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे पूर्वी नोंदविलेल्या बयानाची सरवदे यांनी पडताळणी केली.