शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध पहिला ‘एफआयआर’

By admin | Updated: January 10, 2017 00:05 IST

महापालिकेच्या तक्रारीवरुन कचरा जाळणाऱ्याविरुध्द थेट फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.

अमरावती : महापालिकेच्या तक्रारीवरुन कचरा जाळणाऱ्याविरुध्द थेट फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.कचरा जाळण्यासंदर्भात महापालिकेद्वारे नोंदविण्यात आलेली ही पहिली फौजदारी तक्रार ठरली आहे.याप्रकरणीची तक्रार गाडगेनगर पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.खुल्या जागेवर कचरा जाळणे व प्रदुषण करणे हा फौजदारी गुन्हा आहे.कचरा जाळण्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थाना कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार कचरा जाळणाऱ्याला ५००० रुपयांपर्यंतचा दंड ठोठावल्या जावू शकतो. यात फौजदारीची तरतूद सुध्दा आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि हवा प्रदुषण १९८१ च्या कायद्यान्वये कचरा जाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.त्या अनुषंगाने महापालिकेचे स्वास्थ निरिक्षक एस.एस. राजुरकर यांनी बियाणी चौकात कचरा ज़ाळल्या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली आहे.या पार्श्वभूमिवर नागरिकांनी कुठल्याच प्रकारचा कचरा जाळू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.महापालिकेच्या कुठल्याही साफसफाई कर्मचाऱ्याला किवा कंत्राटदाराला कचरा जाळता येत नाही. तसे आढळून आल्यास नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी केले आहे. कचरा जाळणे कायदेशिर गुन्हा आहे, हे अजूनही बहुतांश नागरिकांना माहित नाही. त्या पार्श्वभुमिवर महापालिकेने कचरा जाळणाऱ्याविरुध्द थेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने समाजातही जनजागृती होण्यास हातभार लागणार आहे.३ जानेवारीला घडला प्रकारअमरावती : तक्रारीनुसार, ३ जानेवारीला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एसबीआयच्या भिंतीजवळ कचऱ्याचा मोठा ढिग जळताना दिसून आला होता.त्यावेळी तेथे साफसफाई कामगार देवा समुद्रे हा काम करीत होता. तो कचरा अज्ञात इसमाने जाळला. तो कचरा विझविण्याकरिता समुद्रे गेले असता एका नागरिकाने ते छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले व स्वच्छता अ‍ॅपवर प्रसारित केले. त्याआधारे कचरा जाळल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी तक्रार स्वास्थ निरीक्षकाने नोंदविली.वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या सूचनेवरून ही तक्रार नोंदविली आहे. फौजदारी दाखल करून संबंधितांवर कारवाई व्हावी, असा महापालिकेचा हेतू असला तरी कचरा जाळणाऱ्या प्रवृत्तीवर जरब बसावी, ही त्यामागची सकारात्मक भावना आहे. कचरा जाळल्याने हवेत प्रदूषण निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. (प्रतिनिधी)महापालिकेकडून तक्रार : कचरा न जाळण्याचे आवाहन कंत्राटदाराकडून दंड वसूल जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. या पार्श्वभूमिवर स्वच्छतेसाठी कामगार लावण्यात आले असून देवा समुद्रे हा झोन क्रमांक १ च्या कंत्राटदाराचा कामगार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सांगितले. एसबीआयजवळचा कचरा आपण जाळला नाही, असा माफीनामा समुद्रे याने दिला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. तथा संबंधित झोनच्या साफसफाई कंत्राटदाराकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.कचरा जाळणाऱ्याविरुध्द फौजदारी तक्रार नोंदविण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी कुठल्याही नागरिकांनी कचरा जाळू नये.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका