दोन व्यापारी प्रतिष्ठानांना आग

By Admin | Updated: May 19, 2015 00:38 IST2015-05-19T00:38:52+5:302015-05-19T00:38:52+5:30

फरशी स्टॉपजवळील दोन प्रतिष्ठानांना सोमवारी अचानक भीषण आग लागल्याने लाखोंचा माल जळून खाक झाला.

Fire to two business establishments | दोन व्यापारी प्रतिष्ठानांना आग

दोन व्यापारी प्रतिष्ठानांना आग

लाखोंचे नुकसान : फरशी स्टॉपजवळील घटना
अमरावती : फरशी स्टॉपजवळील दोन प्रतिष्ठानांना सोमवारी अचानक भीषण आग लागल्याने लाखोंचा माल जळून खाक झाला. अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.
टांक प्लाझा मार्केटमधील ड्रिम फॅन्शन फुटवेअर व अंडरगारमेंट प्रतिष्ठानाचे संचालक कुणाल अशोक ठाकरे दुपारी २ वाजता दुकान बंद करुन जेवणाकरिता गेले होते. दरम्यान त्यांच्या प्रतिष्ठानातून धूर निघताना अन्य दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देऊन प्रतिष्ठानचे मालक कुणाल ठाकरे यांच्याशी संपर्क केला. काही वेळात अग्निशमन विभागाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविले. तोवर दोन्ही प्रतिष्ठानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसींह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गजेंद्र लोणारे, मच्छिंद्र यादव, प्रेमानंद सोनकांबळे, विलास उमेकर वाहनचालक अब्दूल सदर कुरेशी यांनी आग नियंत्रणात आणली.

Web Title: Fire to two business establishments