शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

अनिल अग्रवालविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

गुरुवारी निखिलच्या आई अरुणा पाटील यांनी अनिल अग्रवाल हेच निखिलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. निखिलला वेतनापोटी दरमहा सहा हजार रुपये मिळायचे. टाळेबंदीच्या काळात दोन महिन्यांपासून निखिलला वेतन देण्यात आले नव्हते. त्याला वेतनाची नितांत गरज होती. त्याने अनिल अग्रवाल यांच्याकडे वेतनाच्या रकमेची वारंवार मागणी केली; परंतु अग्रवाल यांनी वेतन देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देनिखिल पाटील प्रकरण : आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निखिल पाटील या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी अनिल अग्रवाल (५०) यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अनिल अग्रवाल हे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि एका सांध्य दैनिकाचे संपादक आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, निखिल पाटील (२८) हा मराठी पत्रकार भवनात व्यवस्थापन आणि देखभालीसाठी कार्यरत होता. तो पगारी कर्मचारी होता. अध्यक्षांच्या दालनात पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघड झाले. घडलेल्या प्रकाराने पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले. निखिलच्या अकल्पित जाण्याचा धक्का कुटुंबीयांसह अनेकांना बसला.
गुरुवारी निखिलच्या आई अरुणा पाटील यांनी अनिल अग्रवाल हेच निखिलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. निखिलला वेतनापोटी दरमहा सहा हजार रुपये मिळायचे. टाळेबंदीच्या काळात दोन महिन्यांपासून निखिलला वेतन देण्यात आले नव्हते. त्याला वेतनाची नितांत गरज होती. त्याने अनिल अग्रवाल यांच्याकडे वेतनाच्या रकमेची वारंवार मागणी केली; परंतु अग्रवाल यांनी वेतन देण्यास नकार दिला. निखिल मानसिक तणावात गेला आणि त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशा आशयाची फिर्याद निखिलच्या आईने पोलिसांना दिली. त्यानुसार भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
रवि राणा यांनी केली होती अटकेची मागणी
बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी निखिलच्या आईला भेटून घटनाक्रम जाणून घेतल्यावर अनिल अग्रवाल यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी गुरुवारी उचलून धरली.

टॅग्स :Deathमृत्यू