'टाकी फुल्ल करा' दरवाढीच्या भीतीपोटी पंपांवर लागल्या रांगा; इराण-इस्रायल युद्धामुळे दर वाढतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:33 IST2026-03-05T19:31:39+5:302026-03-05T19:33:30+5:30

Amravati : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

'Fill the tank': Queues form at pumps due to fear of price hike; Will prices increase due to Iran-Israel war? | 'टाकी फुल्ल करा' दरवाढीच्या भीतीपोटी पंपांवर लागल्या रांगा; इराण-इस्रायल युद्धामुळे दर वाढतील का?

'Fill the tank': Queues form at pumps due to fear of price hike; Will prices increase due to Iran-Israel war?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याच्या भीतीने शहर आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची मंगळवार ३ मार्च रोजी रात्री दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर अक्षरशः रेटारेटी केली. ही गर्दी अचानक उसळली नाही. तर, इंधन दरात वाढ होणार असल्याची अफवा वेगाने पसरल्याने नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडले.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढणार आणि मध्यरात्रीपासूनच देशातील पेट्रोल-डिझेल महागणार, या चर्चेने अमरावतीकरांमध्ये खळबळ उडाली. मात्र, आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होणार, या केवळ अफवा आहेत. मात्र सोशल मिडियांमधील पोस्टमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात कुठलीही दर वाढ होणार नाही. अजून काही महिने पुरेल, इतका तेलसाठा देशात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नयेत,' असे आवाहन अमरावती जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनने केले आहे. संभाव्य दरवाढीपासून वाचण्यासाठी अनेकजण मिळेल तितके इंधन भरण्याचा प्रयत्न वाहनधारक करत होते. यामुळे तात्पुरता गर्दीची परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी सायंकाळी सात वाजतापासून पंपावर पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या.

अनेकांनी दुचाकीच्या टाक्या केल्या फुल्ल

रात्री बारापासूनच पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे ५ ते १० रुपयांनी मोठी वाढ होणार आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता गाडी फुल्ल करून घ्यायची आहे,' अशा प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी रात्री १२ पर्यंत दुचाकी आणि चारचाकी गाड्या घेऊन अनेकांनी थेट पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याचे दिसून आले. मोर्शी रोड, नवसारी, इर्विन चौकातील पंपावर रांगा पाहायला मिळाल्या.

पेट्रोल, डिझेलचे दर किती ?

सध्या अमरावती पेट्रोल सुमारे १०५ रुपये ११ पैसे प्रतिलिटर, तर डिझेल ९१.६५ रुपये प्रतिलिटरच्या दराने मिळत आहे.

"जिल्ह्यात सध्यास्थितीत पुरेसा पेट्रोल, डिझेलचा साठा आहे. नागरिकांनी याबाबतच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."
- संतोष काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी

"युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, पेट्रोल दरवाढ होण्याची सध्यातरी कुठलीही शक्यता नाही. आपल्याकडे चार महिने पुरेल इतका इंधनाचा साठा उपलब्ध आहे. पेट्रोलची टंचाई भासणार नाही. नागरिकांनी कुठल्याही दरवाढीच्या अफवावर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यात सर्व पेट्रोलपंप नियमित सुरू आहेत."
- सौरभ जगताप, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशन

Web Title : पंपों पर मची अफरातफरी: ईरान-इजराइल युद्ध से बढ़ी कीमतों की आशंका

Web Summary : ईरान-इजराइल संघर्ष के कारण ईंधन की कीमतों में वृद्धि की अफवाहों ने अमरावती में दहशत फैला दी। निवासी पेट्रोल पंपों पर उमड़ पड़े। पेट्रोल डीलर्स एसोसिएशन ने पर्याप्त स्टॉक का आश्वासन दिया और अफवाहों को खारिज करते हुए लोगों से शांत रहने का आग्रह किया।

Web Title : Panic Buying at Pumps: Iran-Israel War Fuels Price Hike Fears

Web Summary : Rumors of rising fuel prices due to the Iran-Israel conflict triggered panic buying in Amravati. Residents rushed to petrol pumps, fearing price hikes. The Petrol Dealers Association assured sufficient stock and dismissed the rumors, urging people not to panic.