ऊर्जामंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:17+5:302021-02-05T05:31:17+5:30

मनसे, तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार तिवसा : वीज बिलासंदर्भात जनतेची वेळोवेळी फसवणूक करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध गुन्हे ...

File a case against the energy minister | ऊर्जामंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

ऊर्जामंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

मनसे, तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार

तिवसा : वीज बिलासंदर्भात जनतेची वेळोवेळी फसवणूक करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी मनसेच्यावतीने तिवसा व कुऱ्हा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

कोरोनाकाळात अवाढव्य वीज बिल आले होते. या काळात रोजगार उपलब्ध नव्हता. त्यामुळे या बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली होती. मात्र, आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सूट देणार नसल्याचे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर थकबाकीदारांची वीज जोडणी कापण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना मिळत आहे. नितीन राऊत यांनी जनतेची फसवणूक केली. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तिवसा तालुकाध्यक्ष तुषार वाढणकर, जिल्हा उपाध्यक्ष चंदेश मानकर, जिल्हा सचिव रावसाहेब काजळकर, तालुका उपाध्यक्ष प्रमोद चव्हाण, अमोल लायबर, कुऱ्हा सर्कल प्रमुख सुभाष चव्हाण, अतुल उमक, गब्बर पवार, रामकीसंन गोंधळी, उमेश वानखडे, अमोल मेहरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: File a case against the energy minister