शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

प्रकल्पात अत्यल्प पाणी, जलसंकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:12 IST

विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून ओळख असलेला वरुड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. तसेच प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याने सद्यस्थितीत पिकांची अवस्था बिकट झालेली आहेत. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

ठळक मुद्देवरुड तालुक्यात नदी-नाले कोरडेच : शेतकरी चिंतेत, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर

संजय खासबागे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून ओळख असलेला वरुड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. तसेच प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याने सद्यस्थितीत पिकांची अवस्था बिकट झालेली आहेत. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.तालुक्यात ९ प्रकल्प असून, यावर्षी पावसाळयात सरासरी ४० टक्केच जलसाठा संचयित झाला. पूर्वी जानेवारीपर्यंत वाहत्या राहणाºया नाल्यांसह नदी कोरडी पडली आहे. ३ सप्टेंबरपर्यंत ९ सिंचन प्रकल्पांपैकी जामगांव प्रकल्पातच ७८.८४ टक्के ेजलसाठा संचयित झाला आहे. वाईमध्ये ६८.२५ टक्के वगळता उर्वरित प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्याने पावसाळा शेवटच्या चरणात असताना भविष्यात या प्रकल्पात जलसंचय होणार की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. यावर्षी ३ सप्टेंबरपर्यंत शेकदरी प्रकल्प पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर असून, ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर असली तरी यामध्ये १९.४० टक्के, पुसली प्रकल्पात पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून, ओलीत क्षमता ३०९ हेक्टर आहे. यामध्ये २५.६१ टक्के, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ मीटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. यात ६८.२५टक्के, सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मीटर, तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर असून ३०.४१ टक्के, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४४८.३० मिटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर असून ५७.४४टक्के, जामगांव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर असून ७८.८४ टक्के, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८१.६० मिटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर असून ४७.४४ टक्के,,जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर असून हे दोन्ही प्रकल्प कोरडे पडले असून ० टक्के जलसाठा आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून, यापैकी २१ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी संत्राझाडे आहेत. रबीतील गहू, चना, संत्रा आणि कपाशी, मिरची आदी पिके घेण्यात येते. परंतु पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलव्यवस्थापन न झाल्यास येत्या काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.विहिरी पुनर्भरणासह पाणी अडवा पाणी जिरवा अभियान महत्त्वाचेवरुड तालुक्यात सिंचनाकरिता उपसा होत असल्याने जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी असते. अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाचे पडणारे पाणी, भूगर्भात जिरणारे पाणी आणि उपसा होणारे पाणी यामध्ये समतोल येणार नाही, मात्र, याकरिता रेनवॉटर हार्वेिस्टंग, विहीर पुनर्भरण कार्यक्रम तसेच पाणी अडवा पाणी जिरवा अभियान राबविणे गरजेचे असल्याचे शेकदरी सिंचन विभागाचे शाखा अभियंता डी.एम.सोनारे यांनी सांगितले.वरुड तालुका कधी होणार ड्रायझोनमुक्त?वरूड तालुका अतिशोषित झाल्याने भूजल पातळी १२०० फुटांच्या खाली गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. यामुळे अतिशोषित वरुड व मोर्शी तालुके १९९४ पासून ड्रायझोन घोषित केले. यामुळे जलसुरक्षा गरजेचे असून जलव्यवस्थापन काळाची गरज आहे. अतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी व बोअर करण्यास बंदी आहे. यावर्षी प्रकल्प भरले नसल्याने विहिरीतील पाण्याची पातळी घटली. यामुळे वरुड तालुका ट्रायझोनमुक्त होणार कधी, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.रेन वॉटर हार्वेस्टिंग ठरले कुचकामीशासनाने तालुक्यात पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबविली. पावसाचे पाणी जमिनीत जावे म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग करुन लाखो रुपये खर्च केले. परंतु, हा प्रयोग कुचकामी ठरला. रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्व साहित्य कुचकामी ठरले आहे. याकरिता मिळणारे शासन अनुदान पाण्यात गेल्याची चर्चा होत आहे.