शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बापटांनाही जुमानत नाही, एफडीएचे अधिकारी

By admin | Updated: May 13, 2016 00:07 IST

आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या अमरावती येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांची ना. गिरीश बापटांसमोर पेशी झाली.

अन्न, पुरवठा मंत्र्यांची बैठक व्यर्थ : एफडीएची कारवाई शून्य संदीप मानकर  अमरावती आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या अमरावती येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांची ना. गिरीश बापटांसमोर पेशी झाली. अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिलेल्या आदेशालाही अधिकाऱ्यांनी खो दिला असून कुठलीही कारवाई केली नाही. ना.बापटांनाही एफडीएचे अधिकारी जुमानत नाही, अशी अमरावतीकरांच्या मनात भावना निर्माण झाल्या आहे. ना. गिरीश बापट यांचा दौरा व्यर्थ गेल्याची चर्चा आहे. अंबानगरीतील फळे विक्रेते नागरिकांना मृत्यु विकत आहेत . आंबे, केळी , पपई पिकविण्यासाठी घातक अशा कॅल्शियम कार्बाईडचा वापर सर्रास होत आहे. हे स्टींगद्वारे सचित्र उघड केले. कलिंगड लाल करण्यासाठी जीवीतास हानीकारक रासायनिक इंजेक्शनचा वापर केला जातो. सफरचंदवर रासायनिक मेनाचा थर लावला जातो. याची 'लोकमत'ने मागील आठवड्यात वृत्त मालिका चालविली.याची दखल घेत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अन्न व पुरवठामंत्र्यांकडे भ्रमणध्वनीवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांची तक्रार केली. आ. सुनील देशमुख यांनी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त यांच्याकडे पत्र देऊन तक्रार केली होती. याची दखल घेऊन गेल्या आठवडयात ना.बापट यांनी विश्रामगृह येथे एफडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व हा प्रकार थांबवावा, अशी ताकिद दिली. परंतु कुभंकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना कुठलाही फरक पडला नाही. आमच्याकडे मनुष्यनाही, असा दिंंडोरा पिटविण्यातच दोन्ही अन्न आयुक्त व्यस्त असतात. शहरात खुुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यासंदर्भाचे दोनदा स्टींग करून हे वृत्त 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले. आ.सुनील देशमुख यांनी तर हप्तेखोर अधिकारी झाल्याचा जाहीर आरोप केला. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना अभय कुणाचे व अन्न व पुरवठा मंत्री त्यांना पाठीसी का घालत आहेत, असा प्रश्न अमरावतीची जनता विचारत आहेत. अमरावतीत फळांमधून कॅन्सरसारखे गंभीर आजार विकले जात आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी फक्त १४ फळांचे नमुने घेऊन आपले कर्तव्य संपले, अशी भूमिका घेतली. एफडीएचे काम पोलिसांनी केले. पोलिसांनी गुटखा पकडून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचा शासकीय पुरावा देऊन एफडीएची पोलखोल केली आहे.