नवजाताचे लिंग कागदोपत्री बदलल्याने पित्याची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:33+5:302021-02-05T05:30:33+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालयात एका महिलेने मेल नवजाताला जन्म दिला. त्याची नोंद जन्मत: मेल अशीच होती. मात्र, पुढील प्रक्रियेदरम्यान फिमेल, ...

The father can afford to change the gender of the newborn | नवजाताचे लिंग कागदोपत्री बदलल्याने पित्याची परवड

नवजाताचे लिंग कागदोपत्री बदलल्याने पित्याची परवड

जिल्हा स्त्री रुग्णालयात एका महिलेने मेल नवजाताला जन्म दिला. त्याची नोंद जन्मत: मेल अशीच होती. मात्र, पुढील प्रक्रियेदरम्यान फिमेल, असे अंकित केल्या गेल्यामुळे डिस्चार्ज घेताना तेथीलच कर्मचाऱ्यांनी आधी बाळाचे लिंग वरिष्ठांकडून निश्चत करून येण्याचा सल्ला दिला. त्यावर नवजाताच्या पित्याने कायदेशीररीत्या अर्ज लिहून सोबत जन्माची नोंद नमूद करून जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक विद्या वाठोडकर यांच्याकडे सोमवारी दुपारी १.५४ वाजता न्यायाची मागणी केली. त्यावेळी डॉ. वाठोडकर यांनी सदर फॉर्मवर अंतर्गत कर्मचाऱ्यांना लिहून दिले आणि बाळाच्या पित्याला सदर फॉर्म कर्मचाऱ्याला देऊन ‘मी लिहिलेले दाखवा, असे सांगितले. तेव्हा कुठे त्या पित्याचा जीव भांड्यात पडला.

बॉक्स

शंकेची पाल चुकचुकली

सदर पित्याला अधीक्षकांनी न्याय दिल्याने त्यांना समाधान झाले असले तरी डफरीन रुग्णालयात नवजाताचा लिंग बदलाचा प्रकार तर होत नसावा, अशी शंका निर्माण झाली होती. यावर अधीक्षकांना विचारणा केली असता, असे होत नाही. जन्माच्या वेळी लिहिलेली नोंद अगदी बरोबर आहे. पुढील नोंदीमध्ये लिखाणात चूक झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The father can afford to change the gender of the newborn