शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

रेती तस्करांचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

सूत्रांनुसार, तलाठी चेतन चकोले गंभीर जखमी झाले आहेत. योगेश बुराळ, रमेश मारग, केवलसिंह गोलवाल, कोतवाल नागेश कनाठे हे किरकोळ जखमी झाले. शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा . राजुराबाजार) व सहा अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता देऊतवाडा रेतीघाटावर हे चार कर्मचारी एमएच ३४ बीडब्ल्यू ९४४१ व एमएच २७ सीक्यू ९०९४  क्रमांकाच्या दुचाकींनी गेले होते.

ठळक मुद्देदेऊतवाडा येथील घटना, दोन दुचाकींची तोडफोड, १२ पसार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यात देऊतवाडा येथे महसूलच्या गस्ती पथकावर रेती तस्करांनी बुधवारी पहाटे साडेतीन वाजता जीवघेणा हल्ला केला. यात एक तलाठी गंभीर जखमी, तर चार जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सूत्रांनुसार, तलाठी चेतन चकोले गंभीर जखमी झाले आहेत. योगेश बुराळ, रमेश मारग, केवलसिंह गोलवाल, कोतवाल नागेश कनाठे हे किरकोळ जखमी झाले. शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा . राजुराबाजार) व सहा अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता देऊतवाडा रेतीघाटावर हे चार कर्मचारी एमएच ३४ बीडब्ल्यू ९४४१ व एमएच २७ सीक्यू ९०९४  क्रमांकाच्या दुचाकींनी गेले होते. रेती तस्करांनी धारदार वस्तूंनी त्यांच्यावर हल्ला केला व  दोन्ही दुचाकींची तोडफोड केली. चेतन चकोले यांचे डोक्यावर गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले. सर्व जखमींना तहसीलदार किशोर गावंडे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांनी पहाटेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तलाठी केवलसिंह गोलवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५३ , ३०७ , ३४ , १४३ ,१४७ , १४८ अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक हेमंत चौधरी, उपनिरीक्षक हिवसेंसह वरूड पोलीस पथक आरोपींचा शोध  घेत आहे.

महसूल कर्मचारी, पटवारी संघटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी रुग्णालयात जखमींची चौकशी केली व कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना केल्या. महसूल कर्मचारी, पटवारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत व सदस्यांनी मारहाणीचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली. 

 

टॅग्स :sandवाळू