शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतीला उपयुक्त पशू जोपासना करावी

By admin | Updated: January 17, 2016 00:06 IST

पशुपालनाचा खर्च परवडत नाही म्हणून पशू पालनाची मानसिकता शेतकऱ्यांकडे राहिली नाही.

ना. प्रवीण पोटे : प्रदर्शनी, शेतकरी मेळाव्याप्रसंगी प्रतिपादनअमरावती : पशुपालनाचा खर्च परवडत नाही म्हणून पशू पालनाची मानसिकता शेतकऱ्यांकडे राहिली नाही. मात्र गाई-म्हैशी पालनातून घरातील स्त्रियांच्या हातात खेळता पैसा राहतो. त्यातून ती स्त्री घराचा थोडातरी खर्च भागवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला उपयुक्त पशू जोपासना करावी, असे आवाहन उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. शनिवारी तळेगाव दशासर येथे आयोजित पशू प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. वीरेंद्र जगताप, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, पं.स.सभापती झाडे, धामणगाव रेल्वे पंसचे सभापती गणेश राजनकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय मुळे, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, सचिन पाटील, प्रीती ढोबळे, रोशन कंगाले, संगीता निमकर, वनिता राऊत, मनोज बानोडे, अब्दुल बशीर शेख हुसेन, कृषक मंडळाचे अध्यक्ष विनोद देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अशोक हजारे उपस्थित होते. मुद्रा योजनेच्यामार्फत तरुणांनी उद्योगासाठी अर्थसहाय्य घेऊन स्वत:ची प्रगती साधावी, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार, पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान याविषयीचा धावता आढावा घेतला. यावेळी समाधान शिबिरांतर्गत लागलेल्या वेगवगेळ्या स्टॉलना पालकमंत्र्यांनी भेट दिली. आ.वीरेंद्र जगताप यांनी तळेगाव दशासर येथील तिनशे वर्षांपासूनची शंकरपटांची परंपरा पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली. जिल्ह्यात एकूण लोकसंख्या २८ लक्ष असून त्यापैकी फक्त २ लाख ४८ हजार लोकांकडेच गायी-म्हैशी आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही. तेव्हा शेतीला कुक्कुटपालनाचे, मेंढीपालनाचा पूरक व्यवसाय करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)