शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बियाणे जमिनीत, नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

धारणी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून बियाणे शेतात टाकण्यात आले. ...

धारणी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून बियाणे शेतात टाकण्यात आले. मात्र, चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आशेने पाहू लागले आहे.

रोज सकाळी आकाशात पावसाचे ढग घोंगावत असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात संध्याकाळ होता होता आकाश निरभ्र होत चालले असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेळघाटातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात यंदासुद्धा सोयाबीनला पहिली पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मक्‍याच्या पेरणीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशातच पावसाने मृग नक्षत्रात ८ ते १३ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. दरम्यान, पावसाने आता मोकळीक दिली आहे. आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. अनेकांची बियाणे उगवले आहे, तर काही शिवारात त्यांनी जमिनीबाहेर डोके काढले आहे. पावसाने आणखी उशीर केल्यास हजेरी न लावल्यास बियाणे खराब होऊन दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती बळीराजा व्यक्त करीत आहे.

दुसरीकडे कृषी विभागाकडून समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. तथापि, ऐनवेळी पावसाने उसंत न दिल्यास पेरणीत अडचण निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. मेळघाटात खरीप हंगामात धान, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिके घेण्यात येतात. प्रामुख्याने सोयाबीन, धान, तूर व मका यंदा शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहेत.