अमरावती: फ्रंट लाईनवर काम करणारे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाच्या महामारीपासून त्या दृष्टीने शहरातील तज्ज्ञ डॉक्टर विजय बख्तार यांनी त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.
पोलीस आयुक्तलयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांना कोविड-१९ महामारीच्या रोगापासून कसे वाचविता येईल, या दृष्टीने डॉ. बख्तार यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी रविवारी संवाद साधला. यामध्ये आजाराची प्राथमिक लक्षणे, घ्यावयाची दक्षता व उपाययोजना याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांच्या कुटुंबीयांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी यावेळी उत्तरे दिली. कोविड-१९ या आजाराबाबत भीती व गैरसमज, दूर करण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला. तसेच कोविडची लस घेण्याचे फायदे व लस न घेतल्यामुळे होणारे नुकसान याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयाने आयोेजित केला होता.