शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

परतवाड्यात विनापरवाना प्रवासी वाहतुकीचा अतिरेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST

अनिल कडू परतवाडा : विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांनी परतवाड्यात अतिरेक चालविला आहे. परतवाडा बसस्थानकाबाहेरील २०० मीटरच्या ...

अनिल कडू

परतवाडा : विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांनी परतवाड्यात अतिरेक चालविला आहे. परतवाडा बसस्थानकाबाहेरील २०० मीटरच्या नो पार्किंग झोनमध्ये रोडवर या बसेस उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात आहे.

बसस्थानक परिसरातून प्रवाशांची उचल होत असल्यामुळे एसटी महामंडळाला लाखोंचा फटका बसत आहे. यात काहींची दादागिरी आणि अरेरावी बघायला मिळत आहे. सामान्य नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. या अनुषंगाने विभागीय नियंत्रकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांना सविस्तर पत्र दिले आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध आणि नो पार्किंग झोन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश देण्याबाबत सुचविले. परतवाडा बसस्थानकासमोरून रोज अशा ८० ते ९० बसेस विनापरवाना प्रवासी वाहतूक करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या बसचे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रवासी वाहतुकीचे मूळ परवाने व वेळापत्रक तपासण्याची मागणीही पत्रात केली आहे.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अशा विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचे संचालन बंद करणेबाबत परतवाड्यातील दोन, आकोट व अंजनगाव सुर्जी येथील प्रत्येकी एक अशा एकूण चार बस संचालकांवर नोटीस बजावली आहे. विनापरवाना अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करताना वाहन आढळून आल्यास ते वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. या नोटीसमध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी त्या वाहनांचे नंबरही नमूद केले आहेत. यात काही वाहन मध्यप्रदेश पासिंगची आहेत.

परतवाड्यातून होणाऱ्या विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन संचालकांचा जुनाच वाद आहे. यातून एकमेकांविरुद्ध तक्रारीही घडत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीस, एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेले पत्र व पोलीस तक्रारीच्या अनुषंगाने अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश लागतो की ती अधिक फोफावते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.