शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लिनचीट’ मिळालेल्या कर्मचाऱ्यांवरही फौजदारी

By admin | Updated: May 2, 2015 00:19 IST

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील अपहारप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे.

तक्रार : पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धावअमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील अपहारप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे. यात ‘क्लिनचीट’ मिळालेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे असल्याने ते चक्रावून गेले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धाव घेत निवेदन सादर केले आहे.सेवानिवृत्त अधीक्षक रामदास डोंगरे, सहायक क्षेत्रिय अधिकारी मंगेश वाटाणे यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात महापालिका प्रशासनाने २९ एप्रिल रोजी येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संत सांस्कृतिक भवनात अपहार झाल्याप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. मात्र, या तक्रारीत समाविष्ट दोन नावांना यापूर्वीच सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्यांनी निर्दोष सिद्ध केले आहे. असे असताना सांस्कृतिक भवनाचे अपहार प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घेतला असताना आम्ही दोषी कसे?, असा सवाल रामदास डोंगरे यांनी उपस्थित केला आहे. सांस्कृतिक भवनाचे भाडे कार्यक्रमधारकांनी भरले नाही, वीज वापराच्या रक्कमेसह एकूण ९६ हजार २०३ रुपये भरण्यात आले नाहीत, असे तत्कालीन व्यवस्थापक पंकज डोनारकर यांनी कबूल केले आहे. परंतु विभाग प्रमुख पदी असल्याने लेखापरीक्षणाच्या अहवालात नाव आल्याचे डोंगरे यांचे म्हणणे आहे. तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक भागवत वारंवार रजेवर जात असल्याने या विभागाचा प्रभार मला देण्यात आला. त्यावेळी माझ्याकडे कर अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार, सामान्य प्रशासन, सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्याचा अतिरिक्त प्रभार देखील होता. तरीदेखील बाजार परवाना विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. मी स्वत: सांस्कृतिक भवनाची पाहणी केली असता नोंदवहीत व्यवस्थित नोंदी नव्हत्या. रेकॉर्डची जुळवाजुळव आढळली नाही. परिणामी तेंव्हा सांस्कृतिक भवनाचे लेखापरीक्षण करुन कार्यवाही करावी, असे आपण प्रस्तावित केले होते. तशा नोंदी लेखापरिक्षण अहवालात आहेत. दरम्यान मिश्रा नामक व्यवस्थापकाचे निलंबन देखील करण्यात आले होते. विभाग प्रमुखाचा पावती पुस्तकाशी काहीही संबंध नाही. तरीदेखील विभागप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दाखल करण्यात आलेली तक्रार मुळातच खोटी आहे. सांस्कृतिक भवनातील घोटाळ्यात मुख्य अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. अधीक्षक, निरीक्षकांचा कोठेही संबंध नसताना या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. पोलिसांकडे दाद मागितली असून प्रसंगी उच्च न्यायालयात जाऊ.- रामदास डोंगरे,सेवानिवृत्त अधिकारी, महापालिका.