शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अंध विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररीची स्थापना करणार

By admin | Updated: June 27, 2016 00:02 IST

येत्या वर्षभरात अंध विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल.

गुणवंताचा गौरव : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : येत्या वर्षभरात अंध विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. या लायब्ररीत अंधांच्या शिक्षणासाठी उपयोगी साहित्य, ब्रेल लिपिशी सुसंगत आवश्यक बाबी पुरविल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. सामाजिक न्याय दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आ. अनिल बोंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजय इंगळे, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते, जिल्हा समाजकल्याण अधिकारी भा.रा. चव्हाण, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी समाजहितासाठी यूपीएससी परीक्षांकडे वळले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केलेल्या तरतुदीतून गोरगरीब व वंचितांसाठी काम केले पाहिजे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मागासवर्गीय गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना पाच हजार रूपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये मीनाक्षी अजनेरिया, अश्विनी भोयर, अमिषा तायडे, हर्ष ढोणे, अंजली कांबळे, विशाल बनसोड, वैशाली वानखडे, निकिता तायडे, पल्लवी सोमकुंवर, अजय तायडे, रविना इंगळे, ऋत्विक शेंडे, रोहिणी आठवले, वैभव तसरे, मयुरी कांबळे, विवेक मोरे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)