शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेन

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही.

अजयवीर जाखड : राजकारणात मला रस नाहीलोकमत मुलाखतसंदीप मानकर अमरावतीमाझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत झटत राहू असे मत भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयवीर जाखड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊ साहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना न्याय, सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. आज ६० वर्ष पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचा मुलगा चांगला शिकला पाहिजे. परंतु राजकारणी लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात विशेषत: अमरावतीत टेक्सस्टाईल हब सुरू होत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला उत्पादन खर्चावर भाव देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.भारताचे भविष्य गावात आहे. परंतु सरकारच्या योजना फक्त शहरासाठी तयार होतात. परंतु ग्रामीण भागाकडे त्यांनी पाठ फिरविल्याचा आरोप यावेळी जाखड यांनी केला. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडणुकीच्या वेळी राजकारण केले जाते. आतातरी मताची किंमत ओळखून आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न निवडता सकारात्मक मानसिकता जपली पाहिजे. माध्यमांनी सुध्दा शहराच्या समस्यांऐवजी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ताकतीने मांडल्या गेल्या पाहिजे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आरक्षणासाठी लढत आहे, तसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरीत किमान २५ टक्के आरक्षण असले पाहिजे. असे झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती उंचावून शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत होईल. शेतकरी आर्थिकरीतीने सक्षम झाल्यास गावाच्या विकास होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या काही शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत ते राजकर्त्यांशी साटेलोटे ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाज दाबल्या गेला आहे. प्रत्येक राज्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातून कपासीवर नियमित बंदी लादली त्या वेळेस १८ महिन्यात सरकारला १७ वेळा अधिसूचना बदलावी लागली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतो. नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात रिजर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी भारत कृषक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते.